धक्कादायक; उपरी, गोपाळपूर अन् पंढरपूर शहरात 'कोरोना' बाधित रुग्ण आढळले..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 07:45 PM2020-05-27T19:45:29+5:302020-05-27T19:48:10+5:30
मुंबईहून आलेल्या त्या व्यक्तीला कोरोनाची लागण; पंढरपूरची आरोग्य यंत्रणा सतर्क
पंढरपूर : उपरी (ता. पंढरपूर) येथे मुंबईवरून आलेल्या एकाला कोरोना संसर्गजन्य रोगाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या त्या ३६ लोकांसह व पंढरपुरात आलेल्या इतरांची कोरोनाची चाचणी करण्यासाठी स्वॅब घेण्यात आले होते. त्यांचा अहवाल बुधवारी आला असून त्यामध्ये तीन जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आल्याचे प्रांत अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितली.
महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यासह मुंबई येथून उपरी (ता. पंढरपूर) आलेल्या येथे आलेल्या लोकांना जिल्हा परिषद शाळेमध्ये कॉरंटाईनवर करून ठेवण्यात आले होते. त्यातील एकाला कोरोनाची लक्षणे आढळून आले होते. त्यानंतर त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये तो कोरोना पॉझिटिव्ह आढळला.
यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या ३६ लोकांना वाखरी ( पंढरपूर) येथील कोविड केअर सेंटर मध्ये संस्थात्मक कॉरंटाईनवर करण्यात आले होते. त्या सर्व लोकांचे कोरोनाच्या चाचणीसाठी सोमावरी स्वॅब घेतले आहेत. यांचा अहवाल बुधवारी आला आहे. त्यामध्ये उपरीतील एक कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. तर मुंबईवरून पंढरपूर शहरात आलेला एक व व गोपाळपूर ( ता. पंढरपूर) एक असे एकूण ३ तीन जणांचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आला आहे, अशी माहिती प्रांत अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.