धक्कादायक; कोरोनाचे गीत गाताना कोरोनानेच गीतकाराचा सोलापुरात दुर्दैवी मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 01:22 PM2020-06-22T13:22:04+5:302020-06-22T13:22:40+5:30
'कोरोना रोगम मर्मम तेललुचको रन्ना' ; कोरोना संदर्भातील कविता सोशल मिडियावर व्हायरल
सोलापूर : कोरोनाच्या महाभयंकर संकटापासून बचाव करण्यासाठी स्वरचित जनजागृतीपर गीत गाणारे गीतकार पुंडलिक दोमल यांना कोरोनाची लागण झाल्याने अवघ्या पाच सहा दिवसातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
लॉकडाउन आणि संचारबंदीमुळे घरातच बसून असलेल्या पुंडलिक दोमल यांना कोरोनाचे भयंकर रौद्ररूप व दगवणारी माणसे यामुळे असह्य वेदना होत होते, त्यापासून बचाव करण्यासाठी त्यांच्यातील कवीमन जागृत झाले. कोरोनामुळे शहरात सर्वात जास्त मृत्यू तेलुगू भाषिक पट्ट्यात होताना दिसत होते.
प्रबोधन या भागातील लोकांमध्ये व्हावे या उद्देशाने त्यांनी जनजागृतीपर कविता तेलगुतून लिहिली. दोमल हे तेलुगू भाषिक असून मराठी आणि तेलुगू भाषेवर त्यांचे प्रभुत्व आहे. मराठीतून ही कविता भाषांतरीत करण्याअगोदर कोरोनाने त्यांचा पाश आवळला. तेलुगू भाषिक असलेल्या पूर्व भागातील संक्रमित रुग्णांची वाढती संख्या, उपचाराविना तडफडून मरणाऱ्यांची संख्या त्यांना अस्वस्थ करीत होती, यापासून बचावासाठी गीताच्या माध्यमातून लोकांचे प्रबोधन, जनजागृती करावे यासाठी त्यांच्यातील कविमन आतुर होते. 'कोरोना रोगम मर्मम तेललुचको रन्ना' अर्थात कोरोनाचे मर्म ओळखून त्याचे संक्रमण रोखू या, त्याची लढा देऊ या अशा आशयाची ही कविता तयार झाली.
दोमल स्वतः गायक असल्याने त्यांनी तेलगू लोकगीतांच्या चालीवर गावुन त्याचे रेकॉर्डिंग केले आणि सोशल मीडियावर ते गीत व्हायरल होताच हजारो लाइक्स, शेअर्स मिळत होते, गीताच्या सुंदर रचनेबद्दल व सुरेल गायनाबद्दल दोमल यांना लोक फोनवरून कोतुक करीत असतानाच त्यांचे फोन घेणे बंद झाले, ते आजारी पडले किरकोळ ताप आणि निमोनियची लक्षणे आढळून आले, उपचारानंतर ते बरे झाले तात्पुरते. पुन्हा ताप आला तेंव्हा कोरोनाची लक्षणे दिसून आली, त्यानं उपचारासाठी यशोधरा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अवघ्या चार दिवसातच कोरोनाशी लढण्यासाठी प्रबोधनपर गीत गायन करणाऱ्या या कलावंताचा कोरोनाने बळी घेतला. त्यानी गायलेले 'श्री मार्कंडेय चरित्र गान' संपूर्ण आंध्र, तेंलगना सह संपूर्ण भारतात लोकप्रिय आहेत. त्याच्या हजारो सीडी, डीव्हीडी प्रकाशित झाल्या आहेत.