धक्कादायक; घरात भांडण सुरू असताना शेजाऱ्याने अंगावर सोडला कुत्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2022 15:44 IST2022-01-21T15:42:24+5:302022-01-21T15:44:11+5:30
कलावती नगरातील प्रकार : तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

धक्कादायक; घरात भांडण सुरू असताना शेजाऱ्याने अंगावर सोडला कुत्रा
सोलापूर : घरामध्ये पत्नीसोबत भांडण सुरू असताना शेजारच्यांनी येऊन चप्पलने मारहाण करत, अंगावर कुत्रा सोडल्याप्रकारणी तिघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १७ जानेवारी रोजी सकाळी ११.१५ वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
अक्षय देशमुख, गजानंद कोळी, सिद्धू देशमुख (सर्व रा. कलावती नगर, एमआयडीसी, सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. लक्ष्मण गुरुलिंगप्पा तोळनुरे (वय ३३, रा. झाडबुके पिठाच्या गिरणीजवळ कलावतीनगर, एमआयडीसी, सोलापूर) हे घरामध्ये पत्नीसोबत भांडण करत होते. तेव्हा शेजारी राहणारे तिघेजण त्यांच्या घरासमोर आले. मागील भांडणाचा राग मनात धरून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दगडा- चप्पलने मारहाण केली त्यानंतर त्यांनी पाळलेला कुत्रा लक्ष्मण तोळनूरे यांच्या अंगावर सोडला. कुत्र्याने ही त्यांना चावा घेऊन जखमी केले. त्यानंतर तिघांनी त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी लक्ष्मण तोळनुरे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.