धक्कादायक घटना! सोलापुरात दारुच्या नशेत त्याने ब्लेडने छाती अन् पोट कापून घेतलं...
By विलास जळकोटकर | Updated: May 2, 2024 20:26 IST2024-05-02T20:25:04+5:302024-05-02T20:26:23+5:30
बापुजी नगरात ही घटना घडली. मारुती हणमंतू बंटुपागुल (वय- ४०) असे या तरुणाचे नाव आहे.

धक्कादायक घटना! सोलापुरात दारुच्या नशेत त्याने ब्लेडने छाती अन् पोट कापून घेतलं...
विलास जळकोटकर, सोलापूर: दारुच्या आहारी गेल्यानंतर कोण काय करेल याचा नेम नाही. सोलापुरातील एका तरुणानं बापुजी नगरात दारुच्या नशेमध्ये ब्लेडनं स्वत:च्या छातीवर, पोटावर चिऱ्या मारुन घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. रक्तबंबाळ अवस्थेत त्याला येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. गुरुवारी दुपारी २:३० च्या सुमारास ही धक्कादायक घटना बापुजी नगरात ही घटना घडली. मारुती हणमंतू बंटुपागुल (वय- ४०) असे या तरुणाचे नाव आहे.
यातील तरुणाला व्यसन होते. खूप आहारी गेल्यानं त्याला नशेत आपण काय करतो याचेही भान राहिले नाही. गुरुवारी दुपारी तो बापूजी नगर, शास्त्रीनगर येथे राहत्या घरी बसलेला होता. अचानक त्याने हातात ब्लेड घेऊन स्वत:च्या छातीवर, पोटावर चिऱ्या मारुन घेतल्या. यामुळे तो रक्तबंबाळ झाला. तातडीने दुपारी तीनच्या सुमारास त्याचे नातलग अभिषेक बोजे यांनी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. त्याच्यावर उपचार सुरु असून, तो शुद्धीवर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.