धक्कादायक; पाच फुटी नागाने गिळले दोन दिवसापुर्वी जन्मलेल्या कुत्र्याच्या पिल्लाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2021 07:40 PM2021-12-10T19:40:44+5:302021-12-10T19:41:03+5:30
गुळवंची कोंडी रोडवरील घटना : सर्पमित्रांनी नागाला केले निसर्गात मुक्त
सोलापूर : गुळवंची कोंडी रोडवरील एका वीट भट्टीवर नाग असल्याची माहीती सर्पमित्रांना मिळाली. नागाचा शोध घेत असता त्याने एक कुत्र्याच्या पिल्लाला गिळल्याचे दिसून आले. काही वेळाने नागाने गिळलेल्या कुत्र्याच्या पिल्लाला बाहेर काढले.
हणमंत कुंभार यांच्या वीट भट्टी उद्योगावर या ठिकाणी एका साप असल्याचे माहीती सुरज बनसोडे व सर्पमित्र प्रवीण बोराडे या सर्पमित्रांना मिळाली. सर्पमित्रांनी सापाचा शोध घेतले असता एका नागाने कुत्र्याच्या पिल्लाला गिळत असल्याचे निदर्शनास आले. पाच फूट लांब असलेला नाग जनावरांच्या कडब्यात जाऊन बसला होता. कडबा भरपूर असल्याने त्यांनी तो कडबा जेसीबीने साहाय्याने काढला. तेंव्हा त्यामध्ये आधी एक धामण हा बिनविषारी सर्प आढळला. तसेच कडब्याच्या खाली असलेल्या दगडामध्ये कुत्र्याचे पिल्लू खाल्लेला अतिविषारी नाग आढळला. त्या दोन्ही सापांस सुरक्षीतरित्या पकडण्यात आले. पकडल्यानंतर त्या कुत्र्याचे पिल्लू गाळलेल्या नागाने उलटीद्वारे बाहेर काढले. ते भक्ष्य साधारणतः २ दिवसा पूर्वी जन्मलेले कुत्र्याचे पिलू होते.
---------
त्यादिवशी आई नव्हती अन् ते तसं घडलं...
या आधीसुद्धा या नागाने दोन पिल्लाला दंश करून ठार केले होते. दोन दिवसांपासून वीटभट्टी वर हा नाग कुत्र्याच्या पिल्लाला खाण्यासाठी यायचा आणि कुत्र्याच्या पिल्लांची आई त्या नागाला हुसकावून लावायची. त्यामुळे नाग पळून जात असल्याचे तेथील कामगारांनी सांगितले. त्यादिवशी त्या कुत्र्याची आई त्यांच्याजवळ नसताना शेवटी नागाने कुत्र्याच्या पिल्लाला गिळले. सर्पमित्रांनी दोन्ही धामण व नागाला सुरक्षितरित्या पकडून निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले.