धक्कादायक; आंघोळीसाठी गेलेले यवतमाळचे चार ऊसतोड मजूर सीना नदीत बुडाले
By Appasaheb.patil | Updated: October 31, 2024 16:36 IST2024-10-31T16:35:25+5:302024-10-31T16:36:09+5:30
बुडालेले चौघे हे ऊसतोड कामगार हे यवतमाळ येथील असल्याची माहिती समोर आली आहे.

धक्कादायक; आंघोळीसाठी गेलेले यवतमाळचे चार ऊसतोड मजूर सीना नदीत बुडाले
सोलापूर/ माढा : सीना नदीवर आंघोळीसाठी गेलेले चाैघे जण बुडाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना माढा तालुक्यातील खैराव येथील सीना नदीपात्रात घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच तहसिल व पोलिस प्रशासन घटनास्थळावर दाखल झाले असून बुडालेल्या चौघांचा शोध घेण्याचे काम वेगाने सुरू असल्याचे पेालिसांनी सांगितले. बुडालेले चौघे हे ऊसतोड कामगार हे यवतमाळ येथील असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, शंकर विनोद शिवणकर (वय २५), प्रकाश धाबेकर (वय २६), अजय महादेव मंगाम (वय २५), राजीव रामभाऊ गेडाम (वय २६) सर्व रा. लसणा टेकडी ता. जि. यवतमाळ अशी बुडालेल्यांची नावे आहेत. लोकमत शी बोलताना पोलिसांनी सांगितले की, जगदाळे वस्ती, खैराव (ता. माढा) येथे ऊसतोड करण्यासाठी ऊसतोड कामगारांची टोळी आली होती. सीना नदीवर चौघे जण आंघोळीसाठी व कपडे धुण्यासाठी गेले होते. शंकर हा प्रथम पाण्यात गेल्यावर बुडायला लागल्यावर प्रकाश त्यास वाचवण्यासाठी गेला असता तोही बुडू लागल्याने इतर दोघेही पाण्यात उतरले. नदीतील पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने चौघेही पाण्यात बुडाले. घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झाले असून दोन तासानंतरही चौघांचा शोध सुरुच होता.