धक्कादायक; लंपी आजाराने एकाच दिवसात चार गाईचा मृत्यू; मृतांची संख्या पोहचली १७ वर

By Appasaheb.patil | Published: October 1, 2022 11:34 AM2022-10-01T11:34:53+5:302022-10-01T11:35:23+5:30

पशुपालकांनी घाबरून न जाता लसीकरण करून घ्यावे; जिल्हाधिकारी यांचे आवाहन

Shocking; Four cows die in one day due to lumpy disease; The death toll has reached 17 | धक्कादायक; लंपी आजाराने एकाच दिवसात चार गाईचा मृत्यू; मृतांची संख्या पोहचली १७ वर

धक्कादायक; लंपी आजाराने एकाच दिवसात चार गाईचा मृत्यू; मृतांची संख्या पोहचली १७ वर

googlenewsNext

सोलापूर : जिल्ह्यात लंपी आजाराने शुक्रवारी चार गाईचा मृत्यू झाल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली. याबाबतची माहिती शनिवारी सकाळी जिल्हा प्रशासनाने दिली. 

सांगोला तालुक्यातील वाढेगाव, मिसाळवाडी आणि धायटी येथील प्रत्येकी एक तर तालुक्यातील कचरेवाडी येतील एका गाईचा मृत्यू झाला. जिल्ह्यात लंपी आजाराने आतापर्यंत १७ जनावरांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १० गाई आणि सात बैलांचा समावेश आहे.

मृत झालेले जनावरे तालुकानिहाय खालीलप्रमाणे
१) माळशिरस- ३ बैल व १ गाय असे एकूण ४, गावाची  नावे - प्रत्येकी १ बैल                 तिरवंडी व २बैल शिंदेवाडी, आणि १ गाय कचरेवाडी
२)सांगोला- ५ गाय,  गावाची नावे - प्रत्येकी १ याप्रमाणे शिवणे , महुद, धायटी, मिसाळवाडी, वाढेगाव
३)पंढरपूर- १ गाय ,गावाचे नाव - कान्हापुरी
४)माढा -१ बैल, गावाचे नाव - चौबे पिंपरी
५)करमाळा-२ गाय , गावाची नावे - सावडी व राजुरी
६)उत्तर सोलापूर - १गाय, ३ बैल एकूण ४ जनावरे, गावाची नावे - १ बैल कवठे, १बैल बेलाटी, १बैल देगांव आणि १ गाय (बसवेश्वरनगर)  देगांव.

पशुपालकांनी घाबरून न जाता जनावरांना लक्षणे दिसल्यास पशु वैद्यकीय दवाखान्यात त्वरित दाखवून घ्यावे. तसेच जनावरांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.

Web Title: Shocking; Four cows die in one day due to lumpy disease; The death toll has reached 17

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.