धक्कादायक; भीमा नदीच्या पात्रात चार जण गेले वाहून; दक्षिण तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 09:54 PM2021-05-29T21:54:31+5:302021-05-29T21:55:28+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Shocking; Four people were carried in the river Bhima; Incidents in South Taluka | धक्कादायक; भीमा नदीच्या पात्रात चार जण गेले वाहून; दक्षिण तालुक्यातील घटना

धक्कादायक; भीमा नदीच्या पात्रात चार जण गेले वाहून; दक्षिण तालुक्यातील घटना

Next

सोलापूर : पोहण्यासाठी गेलेल्या चार जणांचा भीमा नदीच्या पात्रात वाहून गेल्याची घटना शनिवारी लवंगी (ता. दक्षिण सोलापूर) येथे घडली.

दरम्यान, शनिवारी दुपारी 3:30 वाजता शिवाजी रामलिंग तानवडे (वय 40 वर्षे राहणार लवंगी ता. द. सोलापूर) हे भीमा नदीमध्ये पोहण्यासाठी गेले असता थोड्या वेळाने त्यांच्या पाठीमागे तिच्या दोन मुली समीक्षा व आर्पिता व त्यांच्या  सोबत मेव्हण्याचा मुलगा विठ्ठल व मुलगी आरती असे चौघे नदीकडे आले होते, त्यावेळी त्यांना घराकडे हाकलून दिले,  शिवाजी हे पोहत नदीमध्ये आत गेले  असताना थोड्या वेळाने ते चौघे परत नदीमध्ये पोहण्यासाठी उतरले. मुलगी समीक्षा हिस पोहता येत होते, परंतु अर्पिताला थोडे थोडे पोहोता येत होते त्यावेळी ते चौघे नदीपात्रात अंघोळीसाठी उतरले. 

समीक्षा हिस पाण्यात पोहत असताना आरती तिने पकडले व अर्पिता हीस विठ्ठल याने पकडल्याने ते चौघे बुडत असताना त्यांचा आवाज ऐकून शिवाजी लगेच त्यांच्याजवळ पोहत जाऊन समीक्षा व आरती यांना थोडेसे बाजूला किनाऱ्याजवळ सोडून त्यांना कडेला जाण्यास सांगितले आणि अर्पिता व विठ्ठल यास सोबत कडेला आणत असताना पाहिले असता समीक्षा व आरती या पाण्याच्या प्रवाहामुळे बुडाल्या व शिवाजीच्या ताब्यातील विठ्ठल व अर्पिता पण निसटले व ते पण बुडून गेले त्यावेळी शिवाजीचा ही धीर सुटल्याने तो पण बुडत असताना पाहून त्याचे नातेवाईक राचाप्पा उर्फ अप्पू संगप्पा पारशेट्टी याने शिवाजी रामलिंग तानवडे यास बाहेर काढले.

भीमा नदीच्या पाण्यात बुडालेल्या
मुलांची नावे खालील प्रमाणे

१) समीक्षा शिवाजी तानवडे (वय 13) वर्ष इयत्ता आठवी.                 
2) अर्पिता शिवाजी तानवडे (वय 12) वर्ष 7 वी
3) आरती शिवानंद पारशेट्टी (वय 12) वर्ष.  7 वी
4)विठ्ठल शिवानंद पारशेट्टी (वय  10) वर्ष 5 वी

Web Title: Shocking; Four people were carried in the river Bhima; Incidents in South Taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.