धक्कादायक; गोडावूनमध्ये सुगंध जाणवला; सहा लाखांचा गुटखा सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2021 12:35 PM2021-12-13T12:35:15+5:302021-12-13T12:35:18+5:30

गुन्हे शाखेची धाड : महादेव चाकोतेंसह सहा जणांवर गुन्हा; पाच जण अटकेत

Shocking; The fragrance was felt in the sweetness; Gutkha worth Rs 6 lakh was found | धक्कादायक; गोडावूनमध्ये सुगंध जाणवला; सहा लाखांचा गुटखा सापडला

धक्कादायक; गोडावूनमध्ये सुगंध जाणवला; सहा लाखांचा गुटखा सापडला

Next

सोलापूर : पोलीस आयुक्तांच्या भरारी पथकाने गुटखा पकडल्यानंतर त्याचा पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलीस करत होते. दरम्यान, हैद्राबाद रोडवरील नवसमता ट्रान्सपोर्टच्या गोडावूनमध्ये तपासणी करताना सुगंध जाणवला. पाहणी केली असता तेथे सुमारे सहा लाखांचा गुटखा आढळून आला. पहिल्या कारवाईत दोघांवर तर तपासादरम्यान महादेव चाकोतेंसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पाच जण अटकेत आहेत.

मोहम्मद इमरान मोहम्मद हनिफ (वय ४२, राहत रेसिडेन्सी, जुना विडी घरकूल, हैद्राबाद रोड, सोलापूर), सत्तार मोदिनसाब शेख (वय ४९,रा. उत्तर कसबा, बाबाकादरी मशिदजवळ, सोलापूर), सचिन आनंद तावस्कर (वय ३१, रा. धुळखेड, ता. इंडी, जि. विजयपूर राज्य कर्नाटक), व्यवस्थापक परमेश्वर आंदप्पा पाटील (वय ४८, रा. भवानी पेठ, सोलापूर), महादेव बाबुराव चाकोते (वय ७५, रा. जोडभावी पेठ सोलापूर), सिद्धाराम म्हंतप्पा होळ्ळे (वय ४९, रा. मंगलघाट, पोलीस ठाणेजवळ पुसल बसंती आसिफ नगर, हैद्राबाद राज्य तेलंगणा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यामध्ये महादेव चाकोते यांना वगळता पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

पोलीस आयुक्तांच्या भरारी पथकाने दि. ६ डिसेंबर रोजी हैद्राबाद राेडवरील सग्गम नगर येथील मोहम्मद इम्रान हनिफ याच्या घराशेजारी असलेल्या गोडावूनमध्ये धाड टाकून तीन लाख ८९ हजार ३८७ रुपयांचा गुटखा पकडला होता. या प्रकरणी मोहम्मद इमरान हनिफ याच्यासह अ.सत्तार शेख याला अटक केली होती.

गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक नंदकिशोर सोळुंके यांच्याकडे देण्यात आला होता. तपास करत असताना त्यांना गुटखा कर्नाटक राज्यातील धुळखेड येथून येत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे धुळखेड येथील सचिन तावस्कर याला पोलिसांनी ताब्यात घेतले. दि.९ डिसेंबर रोजी सहायक पोलीस निरीक्षक नंदकिशोर सोळुंके व त्यांच्या पथकाने हैद्राबाद रोडवरील नवसमता ट्रान्सपोर्टच्या गोडावूनची तपासणी केली. तपासणी दरम्यान पोलिसांना गुटख्याचा सुगंध आला, आतमध्ये जाऊन पाहिले असता तेथे आणखी ५ लाख ९२ हजार १०० रुपयांचा गुटखा सापडला. गोडावून व्यवस्थापक परमेश्वर पाटील याला अटक करून चौकशी केली असता, गुटखा हैद्राबाद येथे असलेल्या ट्रान्सपोर्ट ऑफिसमधून येत असल्याची माहिती मिळाली. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हैद्राबाद येथे जाऊन गोडावूनची तपासणी केली, तेथील गोडावून व्यवस्थापक सिद्धाराम होळ्ळे याला अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने मी व मालक मिळून सुगंधी तंबाखू संदर्भात काम पाहतो असे म्हणाला.

 

पाच जण पोलीस कस्टडीत

  • - गुटखा प्रकरणी सध्या पाचजण अटकेत असून त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. तपासा दरम्यान महादेव चाकाेते हे जेलरोड येथील गुन्हे शाखेच्या कार्यालयात गेले होते. पोलिसांनी त्यांना ‘तुम्हीपण यात आरोपी आहात. तुम्हाला अटक केली जात आहे,' असे सांगितले. तेव्हा त्यांनी बीपी, शुगर आणि हार्ट अँजिओग्राफीची कागदपत्रे दाखवली. दुसऱ्या दिवशी हजर होतो, असे त्यांनी सांगितले. पोलिसांनी दुसऱ्या दिवशी हजर होण्याची नोटीस देऊन सोडले, मात्र ते अजूनही परत आलेच नाहीत.
  • - ट्रान्स्पोर्टच्या माध्यमातून हैद्राबादहून सोलापूरकडे गुटखा येत होता; मात्र पोत्यावर नगाचा उल्लेख केला जात होता. आतमध्ये काय आहे याची माहिती दिली जात नव्हती. गुटख्याबरोबर अन्य मालही आजूबाजूला ठेवून आणला जात होता, ही माहिती पोलिसांना मिळाली आहे.

Web Title: Shocking; The fragrance was felt in the sweetness; Gutkha worth Rs 6 lakh was found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.