धक्कादायक; ग्रामीण भागातील कोरोना रूग्णांची संख्या शंभर..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 03:31 PM2020-06-10T15:31:10+5:302020-06-10T16:12:50+5:30

बुधवारी आढळले नवे १७ रूग्ण; नान्नज, भोजप्पा तांडा, नवीन विडी घरकुलमध्ये आढळले रूग्ण

Shocking; Hundreds of corona patients in rural areas | धक्कादायक; ग्रामीण भागातील कोरोना रूग्णांची संख्या शंभर..!

धक्कादायक; ग्रामीण भागातील कोरोना रूग्णांची संख्या शंभर..!

Next
ठळक मुद्दे- ग्रामीण भागात कोरोनाचे रूग्ण वाढले- करमाळा, मंगळवेढा तालुक्यात एकही कोरोना बाधित रूग्ण नाही- रूग्ण वाढत असल्याने आरोग्य विभाग झाला सतर्क

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या शंभर आली आहे. बुधवारी १8 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले. 

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आत्तापर्यंत रुग्णांची संख्या कमी दिसून येत होती, पण अलीकडच्या काही दिवसात ग्रामीण भागात हे रुग्ण वाढत चालल्याचे चित्र आहे. मंगळवारपर्यंत जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या ८२ होती, बुधवारी त्यात सतरा जणांची भर पडल्याने हा आकडा आता 100 वर पोहोचला आहे. कोरोना रूग्णांमध्ये दक्षिण सोलापूर, बार्शी तालुका आघाडीवर आहेत. आत्तापर्यंत तालुकानिहाय आढळलेले रुग्ण पुढीलप्रमाणे आहेत. अक्कलकोट: ८ ( मृत्यू: १),  बार्शी : १९ ( मृत्यू: १), करमाळा : ० ( मृत्यू: ०), माढा : ७ ( मृत्यू: १), माळशिरस : २ ( मृत्यू: ०), मंगळवेढा : ० ( मृत्यू: ०), मोहोळ : ४ ( मृत्यू: १), उत्तर सोलापूर : २ ( मृत्यू: ०), पंढरपूर : ७ ( मृत्यू: ०), सांगोला : ३ ( मृत्यू: १), दक्षिण सोलापूर : ३० ( मृत्यू : १), एकूण: ८२,  मृत्यू: ६ असे आहेत.

करमाळा आणि मंगळवेढा तालुक्यात अद्याप एकही रुग्ण आढळलेला नाही. दक्षिण सोलापूरचा बराच मोठा भाग सोलापूर शेजारी आहे, त्यामध्ये कुंभारी येथील घरकुलमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळले आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यातील तांड्यावर राहणाºया एका पोलिसाला लागण झाल्यावर आरोग्याचे पथक तपासणीसाठी जात असताना हल्ला झाला होता. आता तेथील काहीजण पॉझिटिव्ह आढळले आहेत. जिल्ह्यात रुग्ण वाढू लागल्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. विडी घरकुल येथे निर्जतुकीकरणासाठी ग्रामीण पोलीस पुढे सरसावल्याचे चित्र दिसत आहे.

Web Title: Shocking; Hundreds of corona patients in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.