धक्कादायक; अपघाताचा बनाव करुन पतीने केला पत्नीचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 04:41 PM2019-12-18T16:41:49+5:302019-12-18T16:43:56+5:30
सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; पत्नीला मुल होत नाही म्हणून पतीने घडविला हा अपघात
सांगोला : पत्नीला मुल होत नाही म्हणून पतीने दुचाकीचा अपघात झाल्याचा बनाव करून तिचा पाण्यात बुडवून खून केल्याचे पोलीस तपसात निष्पन्न झाले. हा प्रकार ८ डिसेंबर रोजी रात्री ८.३० च्या सुमारास मांजरी ते देवळे जाणाºया माण नदीवरील अरूंद बंधाºयावर घडल्याचा बनाव केला होता. दरम्यान, मयत शुभांगीची आई राणी पाटील (रा. खळवे, ता. माळशिरस) यांच्या तक्रारी अर्जावरून तपास करुन पोलिसांनी अखेर जावई हणमंत दादासो खांडेकर (वय २९, रा. मेथवडे) याच्याविरूद्ध पत्नीच्या खुनाचा गुन्हा नोंद केला आहे.
मेथवडे (ता. सांगोला) येथील हणमंत दादासो खांडेकर याची मयत पत्नी शुभांगी हिला मुल होत नसल्याने त्याने वैद्यकीय तपासणी केली. यात पती हणमंत याच्यामध्ये दोष असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. त्यामुळे हणमंतने पत्नी शुभांगीस उपचाराकरिता माहेरून पैसे घेऊन ये म्हणून तगादा लावला होता. परंतु शुभांगीच्या माहेरकडून पैसे न मिळाल्याचा राग मनात धरून तसेच आपल्यात दोष असल्याने याविषयी चिडचिड निर्माण झालेल्या हणमंत दादासो मेटकरी याने पत्नी शुभांगी हिला ८ डिसेंबर रोजी रात्री ८ ते ८.३० च्या सुमारास एम.एच. ४५ डब्ल्यू ०३३६ या दुचाकीवरून सासरवाडी खळवे (ता. माळशिरस) येथून देवळे येथे घेऊन निघाला होता. त्याने पत्नी शुभांगीला जीवे मारण्याच्या उद्देशाने बामणी ते सावे मार्गे देवळे या सुरक्षित रस्त्यावरून घेऊन न जाता तिला निर्जन, असुरक्षित रस्त्याने माण नदीच्या अरूंद अशा बंधाºयावरून जाणीवपूर्वक आडमार्गाने आणले. पत्नी शुभांगी हिला पोहता येत नाही, हे माहीत असूनही तिला पाण्यात बुडवून श्वास गुदमरून किंवा अन्य पध्दतीने पाण्यात बुडवून तिचा खून करून पाण्यात टाकून दिले.
पती हणमंत याने एवढ्यावरच न थांबता दुचाकी घसरून पाण्यात पडल्याने पत्नी शुभांगीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे, असा खोटा बनाव केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. याबाबतचा तपास पो.नि. राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रशांत हुले करीत आहेत.
यापूर्वीही अपघाताच्या घटना
- अक्कलकोट-हन्नूर सिमेंट काँक्रिटीकरण रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे़ हा रस्ता वेळेत होत नसल्याची ओरड स्थानिकांमधून सुरू आहे़ या मार्गावर यापूर्वी अनेक अपघात झाले आहेत़ अनेक दिवसांपासून ओरड होत असताना ठेकेदाराकडून रस्ता पूर्ण झाला नाही आणि या रखडलेल्या रस्त्याने वैशाली यांचा बळी घेतल्याची चर्चा अक्कलकोट ग्रामीण रुग्णालय परिसरात सुरु होती़
चपळगावावर शोककळा
- पती धुळप्पा हे शेती करतात तर पत्नी वैशाली यांना टेलरिंगची आवड असल्याने त्या दिवसभर कपडे शिवून गुजराण करायच्या़ त्यांच्या अपघाती निधनाचे वृत्त गावात समजताच चपळगावावर शोककळा पसरली़ त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे़ बुधवारी सकाळी ११ वाजता मयत वैशाली यांची अंत्ययात्रा राहत्या घरापासून निघणार आहे़