धक्कादायक; भाजीत मीठ जास्त झाले म्हणून पतीने कापले पत्नीचे केस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 12:17 PM2018-04-14T12:17:39+5:302018-04-14T12:17:39+5:30

संतापलेल्या पतीने पत्नीचे केस कात्रीने कापून टाकल्याची घटना उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज येथे घडली. 

Shocking The husband's cut off wife's hair is so much as the vegetable has more salt | धक्कादायक; भाजीत मीठ जास्त झाले म्हणून पतीने कापले पत्नीचे केस 

धक्कादायक; भाजीत मीठ जास्त झाले म्हणून पतीने कापले पत्नीचे केस 

Next
ठळक मुद्देपोलिसांनी याची दखल घेत पतीविरूद्ध तक्रार नोंदवून घेतलीपतीने केस कापल्याने रुकसाना लज्जीत दिवसभर घराबाहेर पडली

सोलापूर : भाजीत मीठ जास्त का घातले म्हणून संतापलेल्या पतीने पत्नीचे केस कात्रीने कापून टाकल्याची घटना उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज येथे घडली. 

याप्रकरणी पीडीत रुकसाना हिने पती आसिफ शेख याच्याविरूद्ध दिलेल्या तक्रारीची सोलापूर तालुका पोलिसांनी दखल घेतली आहे. बुधवारी सकाळी रुकसाना हिने पालकची भाजी केली. जेवत अससाना असिफ याला भाजीत मीठ जास्त असल्याचे जाणवले. यावरून तो संतापला व त्याने रुकसाना हिला लाथाबुक्क्याने मारहाण केली. इतक्यावरच तो थांबला नाही तर घरातील कात्री घेऊन त्याने तिचे लांबसडक केस कापून टाकले. पतीने केस कापल्याने रुकसाना लज्जीत दिवसभर घराबाहेर पडली.

अपमानीत झाल्यामुळे गुरूवारी सकाळी आईवडिलांकडे जावे म्हणून ती चालत कारंब्याला आली. घरी आईवडील नाहीत असे पाहून शेजाºयांकडून पैसे घेऊन ती सोलापुरात मौलाली चौकात बहिणीकडे आली. बहिणीने तिची अवस्था पाहिली व तिला न्याय मिळवून द्यावा म्हणून यशदा फौंडेशनच्या नगरसेविका फिरदोस पटेल यांच्याकडे धाव घेतली. तिची अवस्था पाहून पटेल यांनी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांसमोर तिची कैफीयत मांडली.

पोलिसांनी याची दखल घेत पतीविरूद्ध तक्रार नोंदवून घेतली. पती असीफ हा काहीच कामधंदा करीत नाही. पत्नी कामाला जाऊन घर चालविते. ती कामाला गेली नाही की तो त्रास देत असल्याचे चौकशीत समोर आले आहे. 
 

Web Title: Shocking The husband's cut off wife's hair is so much as the vegetable has more salt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.