धक्कादायक; सोलापूरला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा ‘कर्नाटक’ ने केला बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 01:14 PM2020-09-15T13:14:22+5:302020-09-15T13:20:59+5:30

जिल्हाधिकाºयांची बैठक: गरिबांना बेड तर रुग्णालयांना ऑक्सिजनची आवश्यकता

Shocking; Karnataka cuts off oxygen supply to Solapur | धक्कादायक; सोलापूरला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा ‘कर्नाटक’ ने केला बंद

धक्कादायक; सोलापूरला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा ‘कर्नाटक’ ने केला बंद

googlenewsNext
ठळक मुद्देऑक्सिजन पुरवठ्याचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी शंभरकर यांनी ऑक्सिजन पुरवठा संनियंत्रण समितीची बैठक घेतलीजिल्ह्यातील सर्व कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटलमध्ये लागणारा ऑक्सिजनचा दररोज आढावा घेऊन त्यानुसार मागणी कळवलीपुण्याहून ऑक्सिजन टनामध्ये येते. सिलिंडरमध्ये भरल्यानंतर ते क्युबिक किलोमध्ये मोजले जाते

सोलापूर : जिल्ह्यातील कोरोनाबाधित गरिबांना शहरातील सरकारी हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नसल्याची तक्रार झेडपी अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी केली आहे तर दुसरीकडे कर्नाटकने ऑक्सिजन पुरवठा बंद केल्याने रुग्णालयांची अडचण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोमवारी बैठक घेऊन जिल्ह्यातील ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीतपणे सुरु राहावा, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना दिल्या आहेत.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. ज्येष्ठ व्यक्तींना त्रास होऊ लागल्यावर सोलापूरकडे हलविण्याचा सल्ला दिला जात आहे. मात्र सोलापूरच्या सरकारी हॉस्पिटलमधील बेड फुल्ल झाल्याचे सांगितले जात आहे. बार्शीची हीच अवस्था असल्याचे झेडपी अध्यक्ष कांबळे यांनी सांगितले. त्यामुळे ग्रामीण भागात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी उपचाराची यंत्रणा उभी करावी, अशी मागणी केली. इकडे शहरातील दोन हॉस्पिटलला कर्नाटकातून ऑक्सिजन येत होते. कर्नाटक सरकारने आता पुरवठा बंद केला आहे. इतर जिल्ह्यांनीही हीच काळजी घेतल्याने सोलापूरच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन पुरवठ्याचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी शंभरकर यांनी ऑक्सिजन पुरवठा संनियंत्रण समितीची बैठक घेतली. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे, अर्चना पाटील, महाव्यवस्थापक बी.टी. यशवंते, औषध प्रशासनाचे राहुल भालेराव, जिल्हा शल्यचिकित्सक मोहन शेगर, सहाय्यक आयुक्त पुष्पगंधा भगत आदी उपस्थित होते. 

जिल्ह्यातील सर्व कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटलमध्ये लागणारा ऑक्सिजनचा दररोज आढावा घेऊन त्यानुसार मागणी कळवली जावी. ही मागणी पुणे विभागीयस्तरावर विकसित करण्यात आलेल्या वेबसाईटवर नोंदणी करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केली.

ऑक्सिजन हिशोब वेगळा
पुण्याहून ऑक्सिजन टनामध्ये येते. सिलिंडरमध्ये भरल्यानंतर ते क्युबिक किलोमध्ये मोजले जाते. काही हॉस्पिटलकडे याच्या लिटरमध्ये नोंदी आहेत. त्यामुळे ऑक्सिजन नेमके दररोज लागते किती याचा हिशोब समितीच्या सदस्यांना लागेनासा झाला आहे. 

Web Title: Shocking; Karnataka cuts off oxygen supply to Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.