धक्कादायक; मुलीला त्रास देणाºया सासूचा पंढरपुरात खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 01:08 PM2020-01-22T13:08:25+5:302020-01-22T13:11:14+5:30

पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात माहेरच्या नऊ जणांविरूध्द गुन्हा दाखल

Shocking; Maher's mother-in-law murdered because of harassing her daughter | धक्कादायक; मुलीला त्रास देणाºया सासूचा पंढरपुरात खून

धक्कादायक; मुलीला त्रास देणाºया सासूचा पंढरपुरात खून

Next
ठळक मुद्दे- पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात नऊ जणांविरूध्द गुन्हा दाखल- उपचारा दरम्यान झाला सासुचा मृत्यू- मुलीस त्रास देत असल्याच्या कारणावरून झाली मारहाण

पंढरपूर : ही सुद्धा माझ्या मुलीस त्रास देते तिच्याकडे बघा म्हणून मुलीच्या सासूचा खून केल्याप्रकरणी मुलीच्या वडिलांसह माहेरच्या नऊ जणांविरुद्ध पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री साडे बारा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंढरपूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुलीस नांदवण्याच्या व जाचहटीच्या कारणावरून १६ जानेवारी रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास शहाजी नारायण गुंड (वय २४, रा. गुंड वस्ती, तन्हाळी रोड, कासेगाव, ता. पंढरपूर) हे आई सुनीता नारायण गुंड (वय ५५) व वडील नारायण गुंड हे घरी होते. यावेळी शहाजी गुंड यांची पत्नी भाग्यश्री व तिचे वडील इतर नातेवाईक बळीराम गांडूळे, श्रीकांत गांडुळे, दत्तात्रय गांडूळे, लक्ष्मण गांडुळे, चिमाजी गांडूळे, हनुमंत गांडूळे, नाना गुंड, सोमनाथ गांडूळे, समाधान गांडुळे (सर्व रा. तन्हाळी रोड, देशमुख वस्ती कासेगाव, ता. पंढरपूर) यांनी शहाजी गुंड यांच्या अंगावर लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केली.

यावेळी जवळ असलेल्या सुनीता गुंड यांना मोटारीचे केबल, एसटीपीचे पाईप व श्रीकांत याने कसल्यातरी हत्याराने पाठीवर, हातावर, पोटावर मारून गंभीर जखमी केले. तसेच सुनिता गुंड यांच्या अंगावरील तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण बोरमाळ व मोबाईल हिसकावून घेऊन गेले. या मारहाणीमुळे गंभीर जखमी झालेल्या सुनिता गुंड यांच्यावर उपचार चालू होते. उपचारादरम्यान २१ जानेवारी रोजी ११ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला आहे. पुढील तपास सपोनि ओलेकर हे करीत आहेत.


 

Web Title: Shocking; Maher's mother-in-law murdered because of harassing her daughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.