धक्कादायक; ‘त्या’ दुधात आढळले मेलामाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 10:58 AM2020-02-13T10:58:15+5:302020-02-13T11:01:30+5:30

भेसळयुक्त दुधात मेलामाईन व स्वॉरबीटॉल, पॅरॉफिन, मिल्क पावडर असल्याचा अहवाल

Shocking; Melamine found in 'that' milk | धक्कादायक; ‘त्या’ दुधात आढळले मेलामाईन

धक्कादायक; ‘त्या’ दुधात आढळले मेलामाईन

googlenewsNext
ठळक मुद्देअन्न व औषध प्रशासनाकडे आलेला अहवाल प्राप्त झाल्यानंतर आरोपींविरुद्ध कारवाई आणखी तीव्रतिरुमला डेअरीचा केमिस्ट गोरख धांडे व दुसºया डेअरीतील केमिस्ट साळुंके हे दोघे अद्याप फरारभेसळयुक्त दुधात मेलामाईन व स्वॉरबीटॉल, पॅरॉफिन, मिल्क पावडर असल्याचे नमूद

सोलापूर : अन्न व औषध प्रशासनाने पंढरपूर तालुक्यातील सुगाव भोसे येथील श्रीराम दूध केंद्रावर छापा मारून जप्त केलेल्या दुधाच्या नमुन्यात मेलामाईन असल्याचा प्रयोगशाळेने अहवाल दिला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त प्रदीप राऊत यांनी दिली. 

अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने १० जानेवारी रोजी सुगाव येथील श्रीराम दूध केंद्रावर छापा मारून रसायनाद्वारे तयार केलेले ६३८ लिटर कृत्रिम दूध व असे दूध तयार करण्यासाठी वापरण्यात येणाºया विविध प्रकारच्या रसायनयुक्तपावडरीचा २७१९ किलो साठा जप्त करण्यात केला होता. 

जप्त केलेल्या साठ्यात एक मेलामाईनची पिशवी आढळली होती. यावरून डेअरी मालक डॉ. दत्तात्रय जाधव व त्याचा नोकर गणेश गवळी यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम १८८,२७२,२७३,३२८ व अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ५९ अंतर्गत पंढरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

डॉ. जाधव याने भेसळयुक्त दूध तयार करण्यासाठी डेअरीमध्ये आणून ठेवलेला व कायद्याने बंदी असलेल्या मेलामाईन या पदार्थाचा ५० किलोचा (किंमत : १0 हजार २00 रु.) वापर केल्याचे आढळले होते. त्याचबरोबर २९८ किलो दूध पावडर (३५ हजार ७६0 रु.),              १२४९ किलो व्हे. परमीट पावडर (१ लाख ९ हजार ९१२ रु.), ८२४  किलो लॅक्टोज पावडर (९८ हजार  ८८0 रु.), २९८ किलो पॅराफिन (१४ हजार ९00 रु.) असे ४ लाख २ हजार १२ रुपये किमतीचे भेसळीसाठी लागणारे रसायन सापडले होते. हा साठा जप्त करण्यात आला तर तसेच भेसळीने तयार केलेल्या दुधाचे नमुने घेऊन हे दूध जागेवर ओतून देण्यात आले होते. 

दुधाचे नमुने मुंबईतील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवून देण्यात आले होते. प्रयोगशाळेने मेलामाईनबाबत पॉझीटिव्ह अहवाल दिला आहे. भेसळयुक्त दुधात मेलामाईन व स्वॉरबीटॉल, पॅरॉफिन, मिल्क पावडर असल्याचे नमूद केले आहे, असे राऊत यांनी सांगितले. 

दोन्ही केमिस्ट फरार
याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले तिरुमला डेअरीचा केमिस्ट गोरख धांडे व दुसºया डेअरीतील केमिस्ट साळुंके हे दोघे अद्याप फरार असल्याची माहिती करकंब पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पाटील यांनी दिली. अन्न व औषध प्रशासनाकडे आलेला अहवाल प्राप्त झाल्यानंतर आरोपींविरुद्ध कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यातील केमिस्ट साळुंके हा प्रतिलिटर एक रुपया कमिशन घेऊन दूध स्वीकारत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. 

Web Title: Shocking; Melamine found in 'that' milk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.