धक्कादायक; मोहोळमध्ये एका युवकावर सात जणांनी केला प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 08:22 PM2021-09-19T20:22:18+5:302021-09-19T20:24:24+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Shocking; In Mohol, a youth was attacked by seven people | धक्कादायक; मोहोळमध्ये एका युवकावर सात जणांनी केला प्राणघातक हल्ला

धक्कादायक; मोहोळमध्ये एका युवकावर सात जणांनी केला प्राणघातक हल्ला

googlenewsNext

मोहोळ : येथील शिवसैनिकांच्या दुहेरी खून प्रकरणातील आरोपीना सोडविण्यासाठी का मदत करतोस असे म्हणून सात जणांनी तलवार, लोखंडी गज आणि काठीच्या सहाय्याने एका युवकावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी ७ जणांविरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा  दाखल करण्यात आल्याची घटना १८ सप्टेंबर रोजी मोहोळ येथे घडली.

 याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नवनाथ दगडू गायकवाड (रा. संतपेठ पंढरपूर) आणि मोहोळ येथील शिवसैनिकाच्या दुहेरी खून प्रकरणात अटकेत असलेले राष्ट्रवादीचे कायकर्ते संतोष सुरवसे व रोहित फडतरे मित्र आहेत. संतोष सुरवसे व रोहित फडतरे यांची जेलमधून सुटका व्हावी यासाठी नवनाथ गायकवाड प्रयत्न करीत आहे. १६ सप्टेंबर रोजी नवनाथ गायकवाड हा पंढरपूरला जाण्यासाठी  बसस्थानकासमोर थांबला होता.

 यावेळी विकास बनसोडे, विनोद कांबळे, राहुल उर्फ दादा क्षीरसागर, बाळू क्षीरसागर, ऋषी क्षीरसागर, चिम्या बनसोडे, भैय्या क्षीरसागर (सर्व रा. सिद्धार्थ नगर मोहोळ) या सात जणांनी  काठ्या लोखंडी गज व तलवार घेऊन फिर्यादी नवनाथ गायकवाड याला घेराव घालून संतोष सुरवसे व रोहित फडतरे यांच्यासोबत का फिरत होता, त्यांनी आमच्या गल्लीतील दोघांचा खून केला आहे, तू त्यांना बाहेर काढण्यासाठी मदत का करतोस" असे म्हणून त्याच्यावर तलवार, लोखंडी गज व काठीने मारहाण करून गंभीर जखमी केले. यावेळी  एकाने त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन काढून घेतली.  नवनाथ गायकवाड  याला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयामधे हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. दरम्यान १८ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा नवनाथ गायकवाड याने मोहोळ पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार वरील सात जणांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष माने हे करीत आहेत.

Web Title: Shocking; In Mohol, a youth was attacked by seven people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.