चर्चा तर होणारच; सोलापूर जिल्ह्यातील एक आमदार कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 02:32 PM2020-07-11T14:32:40+5:302020-07-11T14:33:20+5:30

शनिवारी दक्षिण सोलापूर, मोहोळ, पंढरपूर, करमाळ्यात आढळले नव्याने रुग्ण

Shocking; MSEDCL employee burnt due to electric shock | चर्चा तर होणारच; सोलापूर जिल्ह्यातील एक आमदार कोरोना पॉझिटिव्ह

चर्चा तर होणारच; सोलापूर जिल्ह्यातील एक आमदार कोरोना पॉझिटिव्ह

Next

सोलापूरसोलापूर शहर आणि जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची स्थिती गंभीर होत चालली असून शनिवारी एका आमदाराचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून सर्वत्र हा चर्चेचा विषय झाला आहे.

जिल्ह्यात शनिवारी दक्षिण सोलापूर, मोहोळ, उत्तर सोलापूर, करमाळा, पंढरपूर तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत़ दक्षिण सोलापुरातील कंदलगाव येथे दोन जण पॉझिटिव्ह आले आहेत, त्यामुळे दक्षिण सोलापूर वाढत चालल्याचे चित्र दिसत आहे तर उत्तर सोलापुरातील मार्डी पुन्हा रुग्ण आढळले आहेत.

एका आमदाराचा रिपोर्ट पॉजिटिव्ह आल्याने शहरात चर्चेचा विषय ठरला आहे़ शहरातील सर्व नगरसेवक व राजकीय कार्यकर्ते पॉझिटिव्ह आलेले ते आमदार कोण आहेत, याबाबत एकमेकांना चौकशी करीत आहेत. विशेष म्हणजे सोलापूर शहरातील कोरोनाचा वाढता संसर्ग कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात याव्यात या विषयावर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे सध्या जिल्हा नियोजन सभागृहात सर्व अधिकाºयांची बैठक घेत आहेत. सोलापुरात संचारबंदी कधीपासून लागू करावी या काळात कोणकोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहे या विषयावर त्यांची चर्चा सुरू आहे.
 

Web Title: Shocking; MSEDCL employee burnt due to electric shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.