धक्कादायक; सर्व्हिस रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या वृद्धेचे घर पेटवून जिवंत जाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 15:22 IST2021-02-04T15:22:26+5:302021-02-04T15:22:32+5:30
सोलापूर ब्रेकींग बातमी

धक्कादायक; सर्व्हिस रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या वृद्धेचे घर पेटवून जिवंत जाळले
सांगोला - सोलापूर - सांगली राष्ट्रीय महामार्गाच्या बांधणीमधील सर्व्हिस रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या ७० वर्षीय वृद्धेचे घर पेटवून जिवंत जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
दरम्यान, हा प्रकार गुरुवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास सांगोला शेतकरी सूतगिरणी समोर घडला. शरीफा खुर्शीद पठाण (वय ७०) असे मृत वृद्धेचे नाव आहे. दरम्यान त्या वृद्धेच्या घराला आग लागल्याचे समजताच नगरपरिषदेचे फायरमन आसीफ काझीसह कर्मचारी, पोलिस कर्मचारी व ग्रामस्थांनी अग्निशमन बंबाच्या साह्याने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला मात्र वृद्धेचा आगीत जळून मृत्यू झाला.
या घटनेच्या अनुषंगाने महामार्गावर काम करीत असलेल्या तीन परप्रांतीय कामगारांना ताब्यात घेऊन पोलीस त्यांच्याकडे कसून चौकशी करीत आहेत याबाबत, समाधान सिताराम मगर (रा. वासूद) यांनी पोलिसात खबर दिली असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत फुले करीत आहेत.