धक्कादायक; आवडीचं जेवण आणलं नाही म्हणून पोलीस निरीक्षकाने बदडले डबेवाल्याला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 11:56 AM2021-03-11T11:56:58+5:302021-03-11T11:57:05+5:30

ग्रामीण पोलीस मुख्यालयातील प्रकार : पोलीस आयुक्तांनी लावली चौकशी

Shocking; The police inspector scolded Dabewala for not bringing his favorite meal | धक्कादायक; आवडीचं जेवण आणलं नाही म्हणून पोलीस निरीक्षकाने बदडले डबेवाल्याला

धक्कादायक; आवडीचं जेवण आणलं नाही म्हणून पोलीस निरीक्षकाने बदडले डबेवाल्याला

googlenewsNext

सोलापूर : मेसच्या डब्यात मांसाहारी जेवण का आणले नाही? असा जाब विचारत पोलीस निरीक्षकाने डबेवाल्याला बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी रात्री ९.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी दिलेल्या निवेदनावरून पोलीस आयुक्तांनी चौकशी सुरु केली आहे.

विजय रावसाहेब घोलप (रा. बापूजी नगर महिला आश्रमसमोर) यांचा खानावळीचा व्यवसाय आहे. ते दररोज डॉ. वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालय येथील डॉक्टर, विद्यार्थी, ग्रामीण व शहर पोलीस कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांना जेवणाचे डबे पुरवतात. ८ मार्च रोजी रात्री ९.४५च्या सुमारास विजय घोलप हे नेहमीप्रमाणे डबे देण्यासाठी ग्रामीण पोलीस मुख्यालयात गेले होते. डबे देऊन परत जात असताना महिला सुरक्षा विशेष कक्षातील पोलीस निरीक्षक शिरीष शिंदे यांनी विजय घोलप यांना अडवले व ‘मला मांसाहारी जेवणाचा डबा का आणला नाही?’ असे विचारत मागील पैशांच्या कारणावरून जाब विचारत मारहाण करण्यास सुरुवात केली.

दरम्यान, मारहाण केल्यानंतर ‘याची कोठेही वाच्यता केलीस तर तुला खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून टाकेन’, अशी धमकीही शिंदे यांनी दिली. पोलीस निरीक्षक शिंदे हे पदाचा गैरवापर करत असून, त्यांच्यापासून मला माझ्या कुटुंबियांच्या जीविताला धोका होण्याची शक्यता आहे. शिरीष शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा व प्रशासकीय स्तरावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी विजय घोलप यांनी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्याकडे केली आहे. याची दखल घेत पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पोलीस उपायुक्त दीपाली धाटे यांना याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

 

Web Title: Shocking; The police inspector scolded Dabewala for not bringing his favorite meal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.