धक्कादायक; पित्याकडून पोटच्या पोरीस गर्भधारणा; अवघ्या १५ वर्षांची मुलगी झाली आई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2021 04:51 PM2021-12-30T16:51:45+5:302021-12-30T16:51:50+5:30

वडील व मुलीच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या जन्मदात्याविरुद्ध पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Shocking; Pregnancy of abdominal pores from father; The mother became a 15-year-old girl | धक्कादायक; पित्याकडून पोटच्या पोरीस गर्भधारणा; अवघ्या १५ वर्षांची मुलगी झाली आई

धक्कादायक; पित्याकडून पोटच्या पोरीस गर्भधारणा; अवघ्या १५ वर्षांची मुलगी झाली आई

Next

पंढरपूर : तालुक्यातील एका गावामध्ये पित्यानेच पोटच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती केले. यामुळे त्या अल्पवयीन मुलीने बाळाला सोमवारी जन्म दिला आहे. वडील व मुलीच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या जन्मदात्याविरुद्ध पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिली.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका अल्पवयीन बालिकेची आई मागील दीड वर्षापूर्वी मयत झाली होती. त्यामुळे ती बालिका तिच्या वडिलाबरोबर राहत होती. या दरम्यान वडिलांनी तिच्याबरोबर शारीरिक संबंध केले. बालिकेस गर्भधारण झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्या वडिलानी तिचा समाजातील मुलाशी विवाह करून दिला. त्यानंतर अल्पवयीन पीडितेसोबत पतीने तीन ते चार वेळा शारीरिक संबंध ठेवला. यातील पीडिता ही अगोदरच गर्भवती असल्याचे समजल्यानंतर पतीने पीडिता हीस तिचे वडिलांकडे आणून सोडले.

त्या पीडित बालीकेला नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर सोमवारी हॉस्पिटलमध्ये प्रसूती झाली. तिने मुलीला जन्म दिला. ही माहिती पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना समजल्यानंतर त्यांनी पीडित बालिकेचा जबाब घेतला. त्यानंतर तिच्या वडील व पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपींना अटक करुन न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. यावेळी आरोपीकडून ॲड. कीर्तीपाल सर्वगोड, ॲड. राहुल भोसले व सरकारकडून ॲड. सारंग वांगीकर यांनी काम पाहिले. त्या पीडित मुलीवर व तिच्या बाळावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: Shocking; Pregnancy of abdominal pores from father; The mother became a 15-year-old girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.