धक्कादायक! पतीशी भांडण; पत्नीनं उवा मारण्याचं औषध पिलं
By विलास जळकोटकर | Updated: March 17, 2023 18:32 IST2023-03-17T18:32:12+5:302023-03-17T18:32:20+5:30
उवा मारण्याचे औषध प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला.

धक्कादायक! पतीशी भांडण; पत्नीनं उवा मारण्याचं औषध पिलं
सोलापूर - अलिकडे भांडण करायला कुठलंही कारण चालतं. अगदी किरकोळ कारणातूनही आत्महत्येसारख्या घटना घडू लागल्या आहेत. सोलापुरातील बाळे परिसरात पती-पत्नीमध्ये भांडण झाले अन् पत्नीने चक्क रागाच्या भरामध्ये चक्क उवा मारण्याचे औषध प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. तातडीने तिला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
शहराचा हद्दवाढ भाग असलेल्या बाळे येथील गणेशनगर भागात राहणाऱ्या शीतल अतुल गुळमे (वय- २९) यांचे गुरुवारी रात्री राहत्या घरी किरकोळ कारणावरुन भांडण झाले. याचा राग सहन न झाल्यामुळे शीतल यांनी घरातले उवा मारण्याचे औषध प्राशन केले. काही वेळानं त्रास होऊ लागला. तातडीने शीतल यांचा भाऊ सौरभ याने सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर उपचार सुरु असून, ती शुद्धीवर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.