धक्कादायक! स्कार्पने केला घात, केसासह मळणी यंत्रात महिला अडकून ठार

By दिपक दुपारगुडे | Published: October 20, 2023 06:52 PM2023-10-20T18:52:56+5:302023-10-20T18:53:37+5:30

बार्शी तालुक्यातील तांदळवाडी गावातील स्वतःच्या सोयाबीन पिकाची मळणी करत असताना महिलेच्या डोक्याला बांधलेला स्कार्प हे मळणी यंत्रात अडकल्याने डोके अडकून ती जागीच ठार झाल्याची दुदैवी घटना शुक्रवार २० ऑक्टोबर रोजी दुपारी घडली. 

Shocking! Scarp ambushes, kills woman with hair trapped in threshing machine | धक्कादायक! स्कार्पने केला घात, केसासह मळणी यंत्रात महिला अडकून ठार

धक्कादायक! स्कार्पने केला घात, केसासह मळणी यंत्रात महिला अडकून ठार

सोलापूर : बार्शी तालुक्यातील तांदळवाडी गावातील स्वतःच्या सोयाबीन पिकाची मळणी करत असताना महिलेच्या डोक्याला बांधलेला स्कार्प हे मळणी यंत्रात अडकल्याने डोके अडकून ती जागीच ठार झाल्याची दुदैवी घटना शुक्रवार २० ऑक्टोबर रोजी दुपारी घडली. 

नंदा भास्कर गरड (वय ६१, रा. तांदळवाडी, ता. बार्शी) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, भानुदास बापूराव गरड (वय ५९) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २०ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी भास्कर गरड याच्या शेतात सोयाबीन मळणीसाठी यंत्र आले होते, त्यासाठी नंदा भास्कर गरड व त्याचा मुलगा रामराजे असे तिघेजण स्वतःच्या शेतात गेले असताना मळणी यंत्र चालू केले. 

नंदा ही मळणी यंत्र चालू असताना त्या मळणी यंत्राच्या खाली पडलेले सोयाबीन पिकांचे दाणे गोळा करत असताना तिने तिच्या डोक्यावर बांधलेला स्कार्प व डोक्याचे केस हे ट्रॅक्टर व मळणी यंत्र जोडणाऱ्या फिरत्या रोडला अडकल्याने तिचे डोकेही फिरत्या रॉडमध्ये अडकले. तिच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. 

याबाबत पांगरी पोलिसात अकस्मत नोंद होताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपात्रे व पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार काशीद हे घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर शवविच्छेदनसाठी पांगरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शब्बीर शेख करीत आहेत.

Web Title: Shocking! Scarp ambushes, kills woman with hair trapped in threshing machine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.