धक्कादायक; सोलापुरात एकाच दिवसात ८१ 'कोरोना' बाधित रुग्ण वाढले, सहा जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 09:34 PM2020-05-28T21:34:40+5:302020-05-28T21:35:33+5:30

सोलापुरातील एकूण रुग्णसंख्या झाली ७४८; आतापर्यंत ७२ जणांचा कोरोनाने मृत्यू...!!

Shocking; In a single day, 81 corona-infected patients died in Solapur, killing six | धक्कादायक; सोलापुरात एकाच दिवसात ८१ 'कोरोना' बाधित रुग्ण वाढले, सहा जणांचा मृत्यू

धक्कादायक; सोलापुरात एकाच दिवसात ८१ 'कोरोना' बाधित रुग्ण वाढले, सहा जणांचा मृत्यू

Next
ठळक मुद्देसोलापुरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढलीकोरोना बरोबर सारी या आजाराचेही आढळले रुग्णसोलापूर शहर पोलीस संचारबंदी काळात सतर्क

सोलापूर : कोरोनाबाधितांची संख्या आज तब्बल ८१ नं वाढून ७४८ पर्यंत गेली आहे. तर आत्तापर्यंत बरे होवून घरी गेलेल्यांची संख्या ३२१ झाली आहे. आजवर सोलापूरात कोरोनामुळं ७२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या ३५५ जणांवर उपचार सुरू आहेत.

सोलापूरात आत्तापर्यंत ७०८४ जणांची कोरोना चाचणी झाली यात ६४२८ अहवाल प्राप्त झाले. ६५६ अहवाल प्रलंबित आहेत. निगेटिव्ह ५६८० अहवाल असून पॉझिटिव्ह ७४८ आहेत.

सोलापूरात आज एका दिवसात २६८ अहवाल आले. यात १८७ निगेटिव्ह आहेत तर ८१ पॉझिटिव्ह असून यात ३८ पुरूष आणि ४३ महिला आहेत. आज ६ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यात ४ पुरूष आणि २ महिलांचा समावेश आहे. तर आज बरं झाल्यानं १० जणांना घरी सोडण्यात आलं.

  • नवे रुग्ण या भागातील आहेत.....
  • सब जेल सोलापूर-२
  • ताशकंद चौक शास्त्री नगर-१
  • केशव नगर पोलीस वसाहत-१
  • पाच्छा पेठ-१
  • बाळीवेस उत्तर कसबा -१
  • किडवाई चौक बेगम पेठ-१
  • अशोक चौक-१
  • बेगम पेठ-१
  • जुना विडी घरकुल -३
  • भूषण नगर-१
  • बुधवार पेठ -२
  • सुनील नगर एमआयडीसी रोड-२
  • घोंगडे वस्ती भवानी पेठ-१
  • संगमेश्वर नगर अक्कलकोट रोड-१
  • रविवार पेठ-२
  • विजापूर नाका बेघर हौसिंग सोसायटी-१
  • हनुमान नगर-१
  • नीलम नगर-३
  • डॉक्टर कॉर्टर सिव्हील हॉस्पिटल-१
  • रेल्वे लाइन्स-१
  • नवीन विडी घरकुल -१
  • कर्णिक नगर -६
  • इंदिरा नगर -१
  • म्हेत्रे नगर एमआयडीसी-३
  • न्यू बुधवार पेठ-५
  • कल्पना नगर-१
  • दक्षिण सदर बझार -१
  • जुना पुना नाका-७
  • एकता नगर -१
  • वसंत नगर पोलीस वसाहत -१
  • शनिवार पेठ-२
  • मजरेवाडी -२
  • भवानी पेठ-४
  • मडकी वस्ती पुना नाका-१०
  • कुमठा नाका -१
  • बादशाह पेठ -२
  • विडी घरकुल -२
  • निजामपूर तालुका सांगोला-१
  • मधला मारुती अक्कलकोट-१
  • शेंद्री तालुका बार्शी-१

-----------------------------------

आज मृत झालेल्या व्यक्ती जामगाव बार्शी ६६ वर्षीय पुरूष. जुना विडी घरकुल ६१ वर्षीय महिला. किडवाई चौक बेगमपेठ ५७ वर्षीय महिला. शास्त्री नगर ७२ वर्षीय पुरूष. भवानी पेठ ५४ वर्षीय पुरूष. रविवार पेठ ७४ वर्षीय पुरूष.

Web Title: Shocking; In a single day, 81 corona-infected patients died in Solapur, killing six

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.