धक्कादायक; गळ्यावर चाकूने वार करून वृद्धेचा निर्घृण खून; सोलापुरातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2022 16:31 IST2022-01-20T16:31:37+5:302022-01-20T16:31:44+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

धक्कादायक; गळ्यावर चाकूने वार करून वृद्धेचा निर्घृण खून; सोलापुरातील घटना
सोलापूर : एमआयडीसी रोडवरील विनायक नगरात राहणाऱ्या वृद्ध महिलेच्या गळ्यावर एका अज्ञात इसमाने चाकूने वार करून खून केला. हा प्रकार बुधवारी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला.
इंदुबाई नारायण खमितकर (वय ७०, रा. विनायक नगर, एमआयडीसी रोड, सोलापूर) असे खून झालेल्या वृद्धेचे नाव आहे. इंदुबाई यांच्या घरातील सर्वजण सायंकाळी नातेवाईकाच्या कार्यक्रमाला गेले होते. कार्यक्रमानंतर घरी आल्यावर त्यांना इंदुबाई खमितकर या रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आले. तातडीने याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याला देण्यात आली. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. घटनास्थळी घरामध्ये चाकूची मूठ आढळून आली. हा खून कोणी केला व का केला? याबाबतचा तपास पोलीस करत आहेत. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. इंदुबाई खमितकर यांना दोन मुले, दोन मुली असा परिवार असून आजूबाजूला नातेवाईक राहत असल्याचे समजते.