धक्कादायक! लॉजमध्ये तरुणाने टॉवलने गळफास घेऊन संपवलं जीवन, घटनेनं खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2024 12:03 PM2024-12-10T12:03:36+5:302024-12-10T12:04:04+5:30
तरुणाला रुग्णवाहिकेद्वारे बेशुद्धावस्थेत सदर तरुणाला शासकीय रुग्णालयात दाखल केले. येथे डॉक्टरांनी तपासणी केली असता, त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.
सोलापूर : शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील एका लॉजमध्ये मुक्कामास असलेल्या परप्रांतीय तरुणाने रुममध्ये टावेलच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार सोमवारी सकाळी ९ च्या सुमारास उघडकीस आला. सरफराज आलम शेख (वय २६, रा. शेरपूर सोंधा किशनगंज, राज्य बिहार) असे या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर तरुण रेल्वे स्टेशन परिसरातील शिवानंद लॉजमध्ये रूम नंबर ११ मध्ये मुक्कामास होता. सकाळी नऊच्या सुमारास हॉटेलच्या लोकांना तो रूममध्ये टॉवेलच्या साहाय्याने अँगलला गळफास घेतल्याच्या अवस्थेत निदर्शनास आला. तातडीने हॉटेलमधील लोकांनी पोलिसांना खबर दिली. सदर बझार पोलिस ठाण्याचे हवालदार एस. एम. शेख यांनी घटनास्थळी भेट देऊन रुग्णवाहिकेद्वारे बेशुद्धावस्थेत सदर तरुणाला शासकीय रुग्णालयात दाखल केले. येथे डॉक्टरांनी तपासणी केली असता, त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. सिव्हिल पोलिस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे.
दरम्यान, सदर तरुण बिहार राज्यातून चार दिवसांपूर्वी सोलापुरात रस्त्याच्या कामासाठी मजुर म्हणून आला होता. तो लॉजमध्ये मुक्कामी असल्याचे असे सांगण्यात येत आहे; मात्र त्यांच्या आत्महत्येचे गूढ कायम आहे. सदरचा प्रकार आत्महत्या की अन्य कोणते कारण असावे, या दृष्टीने सदर बझार पोलिसांनी तपास सुरू ठेवला आहे.