धक्कादायक; रानमसले गावात ३४ वर्षात एकदाही नळाला पाणी आले नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 01:17 PM2019-05-16T13:17:16+5:302019-05-16T13:20:08+5:30

दुष्काळाचा झळा ; पाण्यासाठी नागरिकांची वणवण, जनावरांना चारा, पाणी वेळेवर मिळेना़...

Shocking There was no water in the tank of rain water in 34 years | धक्कादायक; रानमसले गावात ३४ वर्षात एकदाही नळाला पाणी आले नाही

धक्कादायक; रानमसले गावात ३४ वर्षात एकदाही नळाला पाणी आले नाही

Next
ठळक मुद्दे२०११ च्या जनगणनेनुसार रानमसलेची लोकसंख्या ३७७७ इतकी आहेआज चार हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या गावाला दररोज टँकरद्वारे ४० हजार लिटर पाणी दिले जाते.काहींना शेतातून पाणी आणणे सवईचे झाले आहे तर बºयाच कुटुंबांनी शेतात घर केले आहे

सोलापूर : साधारण चार हजार लोकसंख्येचे रानमसले गाव. काही भाग सोडला तर काळी कसदार जमीन. गावात मात्र पाणी शोधूनही मिळत नाही. दोन वेळा गावांतर्गत पाईपलाईन करूनही ३४ वर्षांत नळाला पाणी आले नसल्याचे येथील नागरिक सांगतात. 

उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले गावचा शेतकरी कांदा उत्पादन घेण्यात पटाईत. उन्हाळा संपत आला की, इथला शेतकरी लागतो कांदा पिकाच्या कामाला. कमी कालावधीत अधिक उत्पादन काढण्याची खासियत रानमसलेकरांना जमली आहे. एखादे वर्ष चांगले, मात्र पाऊस नसल्याची मोठी अडचण सातत्याची. आॅगस्ट, सप्टेंबर किंवा कधी-कधी परतीचा आॅक्टोबरचा पाऊस या भागात पडतो. कसाबसा डिसेंबर महिना संपला की, गावाची टँकरची मागणी सुरू होते.

फारच कठीण परिस्थितीत जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात टँकर सुरू करावाच लागतो. गावच्या शिवारात पाणी लागत नसल्याने बीबीदारफळ साठवण तलावाच्या खाली रानमसलेसाठी विहीर खोदली आहे. बीबीदारफळच्या साठवण तलावात पाणी असेल तरच टँकर सुरू करण्याची गरज भासत नाही. बीबीदारफळ तलावात पाणी असले तरी पुरेसे पाणी मिळत नाही, मात्र जेमतेम पाणी मिळते, असे राजाराम गरड यांनी सांगितले. 

साधारण १९८८-८९ मध्ये विहीर पाईपलाईन व गावांतर्गत पाईपलाईन करण्यात आली. त्यावेळी साधारण १९८५ पर्यंत नळाद्वारे गावकºयांना पाणी मिळत होते, असे माजी सरपंच भीमराव तगारे यांनी सांगितले. त्यानंतर पाऊस कमी झाला, पाईपलाईन तूटफुट झाली व नळाद्वारे पाणीपुरवठा बंद झाला. २००३-०४ मध्ये पुन्हा गरजेनुसार गावात पाईपलाईन टाकण्यात आली, तसेच रानमसले शिवारात विहीर घेतली. यानंतरही गावकºयांचे पाण्याचे भोग संपले नाहीत. गेल्या ३३-३४ वर्षांपासून आजपर्यंत नळाला पाणी आले नाही. गावाच्या तीन बाजूला तीन आड आहेत. त्या आडात पावसाळ्यात बीबीदारफळ येथील पाणीपुरवठा विहिरीचे तर उन्हाळ्यात टँकरचे पाणी सोडले जाते. संपूर्ण गावकरी (महिला-पुरुष) आडाचे बारा महिने पाणी शेंदूनच तहान भागवितात.

बीबीदारफळ तलावात विहीर खोदण्यास परवानगी मिळाली तरच आमच्या गावचा पाणीप्रश्न मार्गी लागणार आहे. याशिवाय शिरापूर उपसा सिंचनचे पाणी तलावात सोडले पाहिजे. टँकरवर खर्च करण्यापेक्षा उपसा सिंचनाचे पाणी तलावात सोडले असते तर पाण्याची गरज भागली असती.
-नितीन गरड,
माजी सरपंच, रानमसले

गाव पाणीदार करण्यासाठी...
- गावच्या पिण्याच्या व शेतीच्या पाण्याची अडचण दूर होण्यासाठी वॉटर कपमध्ये भाग घेऊन रानमसलेकर गाव पाणीदार करण्यासाठी एकवटले आहेत. श्रमदान व मशीनद्वारे पाणी अडविण्याची कामे होतील. 

पाण्यासाठी केविलवाणा प्रयत्न...
- दर पाच वर्षांनी होणाºया ग्रामपंचायत निवडणुकीत कोणीतरी सरपंच होतो व पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करतो. रानमसले परिसरातील वडाळा, नान्नज, अकोलेकाटी, गावडीदारफळ, बीबीदारफळ, पडसाळी या गावांची अशीच स्थिती आहे. एका गावात अनेक योजनांची कामे झाली, परंतु आज सर्वच गावे टँकरवर अवलंबून आहेत.

प्रति व्यक्ती १० लिटर पाणी 
२०११ च्या जनगणनेनुसार रानमसलेची लोकसंख्या ३७७७ इतकी आहे. आज चार हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या गावाला दररोज टँकरद्वारे ४० हजार लिटर पाणी दिले जाते. काहींना शेतातून पाणी आणणे सवईचे झाले आहे तर बºयाच कुटुंबांनी शेतात घर केले आहे तर गावकºयांना आडातून शेंदून खांद्यावर पाणी आणण्याची सवय झाली आहे.

Web Title: Shocking There was no water in the tank of rain water in 34 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.