धक्कादायक; शेततळ्यात बुडून तिघांचा मृत्यू; उत्तर सोलापूर तालुक्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2022 19:12 IST2022-01-21T17:46:49+5:302022-01-21T19:12:09+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

धक्कादायक; शेततळ्यात बुडून तिघांचा मृत्यू; उत्तर सोलापूर तालुक्यातील घटना
सोलापूर - शेततळ्यात बुडून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास पाथरी (ता. उत्तर सोलापूर) येथे घडली. या घटनेची माहिती मिळताच सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
याबाबत प्राथमिक माहिती अशी की, कैलास गुंड याच्या शेततळ्यात तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे. यात सारिका अक्षय ढेकळे (वय २२), गौरी अक्षय ढेकळे (वय ५) व आरोही अक्षय ढेकळे (वय २) असे मृत तिघांची नावे आहेत. आईने आपल्या दोन मुलींसह आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. याबाबत पोलीस तपास करीत आहेत.