धक्कादायक; प्रसुती दरम्यान डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हॉस्पिटलमध्ये महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 13:11 IST2021-03-24T13:07:34+5:302021-03-24T13:11:07+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग

धक्कादायक; प्रसुती दरम्यान डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हॉस्पिटलमध्ये महिलेचा मृत्यू
मंगळवेढा : मंगळवेढा शहरातील महिला हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका २१ वर्षीय महिलेचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाल्याची घटना २४ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास घडली. आशंका संभाजी भुसे (माहेरकडील नाव) वय २१ रा.घरनिकी ता. मंगळवेढा असे मयत महिलेचे नाव आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, यातील मयत महिलेचे गरोदर पणाचे ९ महिने ७ दिवस पुर्ण झालेले होते. तिला प्रसुती वेदना सुरू झाल्याने तिला तिची आई मालन संभाजी भुसे यांनी महिला हॉस्पीटल मंगळवेढा येथे २३ मार्च रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास दाखल केले होते. तिचा उच्च रक्तदाबाचा त्रास होता. २४ मार्च रोजी मध्यरात्री बाराच्या सुमारास त्या महिलेने बाळाला जन्म दिला. मात्र रक्तदाबाच्या अति त्रासाने तिचा बुधवार २४ मार्च रोजी पहाटे मृत्यू झाला. या घटनेची मंगळवेढा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल बामणे हे करीत आहेत. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे त्या महिलेचा मृत्यू झाल्याची तक्रार नातेवाईकांनी पोलिसात दिली आहे.