जनहितने पालकमंत्र्यांच्या प्रतिमेला मारले जोडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:21 AM2021-05-01T04:21:23+5:302021-05-01T04:21:23+5:30
मोहोळ : सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कोणतीही तरतूद नसताना उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यात नेण्याचा ...
मोहोळ : सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कोणतीही तरतूद नसताना उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यात नेण्याचा प्रयत्न करत आहेत. याच्या निषेधार्थ जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने प्रभाकर देशमुख यांनी शुक्रवारी सायंकाळी मोहोळ शहरात कार्यकर्त्यांच्या उपस्थित भरणे यांच्या प्रतिमेला जोडे मारुन आंदोलन केले.
यावेळी ते पाणी पळविण्याचे कटकारस्थान हाणून पडल्याशिवाय जनहित शेतकरी संघटना गप्प बसणार नसल्याचे म्हणाले, पालकमंत्र्यांना जोडे मारून गप्प बसणार नाही, तर भविष्यात हातात रूमणे घेऊन पालकमंत्र्यांना जाब विचारला जाईल. तसेच पालकमंत्री तुम्ही ट्रेलर दाखवा... आम्ही डायरेक्ट पिक्चर दाखवतो, असे मत देशमुख यांनी व्यक्त केले. तसेच १ मे रोजी उजनी पाणी बचाव संघर्ष समितीच्या जलसमाधी आंदोलनात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी जनहित शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष किरण भांगे, जयप्रकाश मोरे,रोहन निमसे,सौरभ विपट उपस्थित होते.
----
३० मोहोळ
जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रतिमेला जोडे मारुन निषेध नोंदवताना प्रभाकर देशमुख आणि कार्यकर्ते.