परिवहन कर्मचााºयांचे चौदा महिन्याच्या वेतनासाठी 'शोले'आंदोलन
By appasaheb.patil | Published: July 8, 2019 01:48 PM2019-07-08T13:48:40+5:302019-07-08T13:51:12+5:30
जुळे सोलापुरातील पाण्याच्या टाकीवर चढून महापालिकेच्या विरोधात घोषणाबाजी
Next
ठळक मुद्दे- परिवहन कर्मचाºयांच्या वेतनासाठी प्रहार संघटना आक्रमक- या आंदोलनात महिलांचा सहभाग मोठा होता- पोलीसांनी घेतली घटनास्थळी धाव, बंदोबस्तात करण्यात आली वाढ
सोलापूर : सोलापूर महानगरपालिका परिवहन खात्याच्या कर्मचाºयांचे चौदा महिन्यांचे थकीत वेतन मिळावे, यासाठी प्रहार कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली जुळे सोलापूर येथील पाण्याच्या टाकीवर चढून आज सकाळपासून शोले स्टाईल आंदोलन सुरू केले आहे.
या आंदोलनात १०० हून अधिक कर्मचारी सहभागी आहेत. सकाळी सहा वाजल्यापासून सुरू केलेल्या आंदोलनात महिलांचाही सहभाग आहे. वेतन मागण्यासाठी परिवहन कर्मचारी गेल्या पंधरा दिवसांपासून संपावर आहेत. यादरम्यान त्यांनी आंदोलनं करून लक्ष वेधले; पण त्याचा प्रशासनावर दबाव न आल्याने शोले आंदोलन सुरू केल्याचे कामगारांनी सांगितले.