संशयकल्लोळातून पत्नीला चोपले; पतीविरुद्ध गुन्हा
By दिपक दुपारगुडे | Published: April 7, 2024 07:24 PM2024-04-07T19:24:49+5:302024-04-07T19:25:53+5:30
विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे. पुढील तपास हवालदार जाधव करीत आहेत.
सोलापूर: ‘तु फोनवर कोणाबरोबर बोलत आहे’ या कारणावरुन नवऱ्यानं बायकोला लोखंडी रॉडनं गालावर पाठीवर मारहाण करुन जखमी करण्याची घटना सकाळी घडली. या प्रकरणी पत्नी सोनाली धोंडिराम तुर्भे (रा. पद्मावती अपार्टमेंट, कोनार्क नगर, सोलापूर) यांच्या फिर्यादीनुसार पती धोंडिराम मलसिद्ध तुर्भे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदला आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादी व नमूद व्यक्ती हे पती-पत्नी आहेत. फिर्यादी ही फोनवर बोलत असताना पतीने ‘तु फोनवर कोणाला बोलत आहे’ अशी विचारणा करुन रागाच्या भरामध्ये लोखंडी रॉडने गालावर, पाठीवर मांडीवर मारहाण केल्याने दुखापत झाली. तसेच शिवीगाळ करुन ‘तुला जिवंत मारतो’ अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे. पुढील तपास हवालदार जाधव करीत आहेत.