दुकान बाजार बंदीचा तृतीयपंथीयांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:16 AM2021-06-03T04:16:55+5:302021-06-03T04:16:55+5:30

संचारबंदीमुळे यांना कोणीही मदत करत नाही. त्यांना रूढी-परंपरेनुसार मदत मागायलाही बाहेर जाता येत नाही. यापूर्वी बाजारात त्यांना मदत मिळायची ...

Shop market ban hits third parties | दुकान बाजार बंदीचा तृतीयपंथीयांना फटका

दुकान बाजार बंदीचा तृतीयपंथीयांना फटका

Next

संचारबंदीमुळे यांना कोणीही मदत करत नाही. त्यांना रूढी-परंपरेनुसार मदत मागायलाही बाहेर जाता येत नाही. यापूर्वी बाजारात त्यांना मदत मिळायची तीही आता बंद झाली आहे. त्यामुळे शासनाने अडचणीत सापडलेल्या या वंचित घटकांना मदत दिली पाहिजे, अशी मागणी होत आहे. सेक्शन चौदा येथे मिरे ग्रामपंचायत हद्दीत दाजी भाग्यवंत यांनी या तृतीयपंथींना आसरा दिला आहे. भाग्यवंत यांनी या तृतीयपंथींना स्वतःचे घर म्हणून प्रत्येकाला पत्राशेडवजा घर करून त्यांना रहायला हक्काचा निवारा दिला आहे.

काही तृतीयपंथींना उदरनिर्वाह चालवण्यासाठी शेळ्या, म्हशी, जर्सी गाई आहेत. त्यावर ते उपजीविका करतात. मात्र दीड वर्ष झाले कोरोनामुळे संचारबंदी असल्याने त्यांना खूपच अडचणींचा सामना करावा लागत आहे. मागील वर्षी विजय गुंड-पाटील यांनी तीनवेळा किराणा मालाचे साहित्य या तृतीयपंथीयांना दिले होते. या वंचित घटकातील नागरिकांना शासनाने मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Web Title: Shop market ban hits third parties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.