कीटकनाशक साठा बाळगणाऱ्या दुकानदाराला कोठडी हवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:23 AM2021-07-29T04:23:46+5:302021-07-29T04:23:46+5:30
पोलीस सूत्रांनुसार जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी सागर बारवकर व स्थानिक गुन्हे शाखेचे साहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांच्या ...
पोलीस सूत्रांनुसार जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी सागर बारवकर व स्थानिक गुन्हे शाखेचे साहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांच्या पथकाने २६ जुलै रोजी आष्टी येथील पत्राशेडच्या गोडाऊनमध्ये धाड टाकली. यात विविध कंपन्यांची संशयास्पद कीटकनाशके सापडली. यावेळी दुकानदार सिद्धेश्वर माने यांच्याकडे कीटकनाशकांचे व औषधांचे साठे बाळगण्यासाठी परवाना नसल्याचे आढळले. गोडाऊनमध्ये ३ लाख ८३ हजार ८८५ रुपये किमतीचा साठा जप्त केला. प्रभारी कृषी अधिकारी गजानन मारडकर यांच्या फिर्यादीनुसार एडन क्रोप केअर को राजकोट अहमदाबाद, आनंद ॲग्रो केअर, हवेली व ग्रीन इंडिया ॲग्रो स्ट्रक्चर हवेली या कंपन्यांबरोबरच सिद्धेश्वर माने अशा चौघांवर मोहोळ पोलीस ठाण्यात २७ जुलै रोजी गुन्हा नोंदला होता.
----
कंपन्यांची नोंदणी तपासायचीय
तपास अधिकारी धनाजी खापरे यांनी आष्टीचा खत दुकानदार सिद्धेश्वर माने याला मोहोळच्या न्यायालयात उभे केले. यावेळी पोलिसांनी या कीटकनाशक व विविध औषधांच्या या कंपन्यांची कृषी आयुक्तालयाकडे नोंद आहे किंवा नाही. याबाबत सखोल तपास करावयाचा आहे. यासाठी पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती मान्य करीत दुकानदारास ३१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिली. अधिक तपास आहाय्यक पोलीस निरीक्षक धनाजी खापरे करीत आहेत.
-----