'तो' दुकानदार 23 मार्चपासून होता सोलापुरात; सात हजारांपेक्षा जास्त व्यक्तींची होणार तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 10:20 AM2020-04-13T10:20:15+5:302020-04-13T10:26:24+5:30
तेलंगी परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप; बाहेर पडण्याचे केले आवाहन खासगी रुग्णालयातील 30 कर्मचाऱ्यांसह 85 लोकांना घेतले ताब्यात
सोलापूर : तेलंगी पाच्या पेटीतील एका प्रार्थनास्थळ च्या बाजूला असलेल्या घरामध्ये मरण पावलेली व्यक्ती पॉझिटिव्ह असल्याची माहिती कळताच संपूर्ण परिसर पोलिसांनी सील केला आहे विशेष म्हणजे संबंधित दुकानदार 23 मार्च पासून सोलापुरात होता हेही उघडकीस आले आहे त्यामुळे या परिसरातील सात हजारांपेक्षाही जास्त लोकांची तपासणी होणार आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.
स्थानिक नागरिकांना घराच्या बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा लावण्यात आल्याने परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान जोडबसवांना चौक व पद्मशाली चौकाकडून अचानक पोलीस गाड्या येण्यास सुरुवात झाली.
तेलंगी पच्चा पेठ येथील एका प्रार्थना तळाच्या बाजूला असलेल्या घराजवळ पोलिसांच्या गाड्या थांबल्या. दरम्यान, तत्काळ जोड बसवांना चौक ते जमखंडी फुल पोलिसांनी बंद केला.
शासकीय रुग्णालयाचे रुग्णवाहिका वाजत दाखल झालेले पोलिसांनी तत्काळ सर्व परिसरातील केला. दरम्यान शासकीय रुग्णालयाचे आणखी एक रुग्णवाहिका तेलंगी पछा पेठ येथे दाखल झाली. रुग्णवाहिकेतून पीपी किट घातलेले डॉक्टर, नर्सेस आणि ब्रदर्स खाली उतरले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्वजण पूर्ण पॉझिटिव्ह निघालेल्या मृत व्यक्तीच्या घरी गेले. घरातील नातेवाईक व परिसरातील लोकांशी चर्चा केली. घरातील मृतांची पत्नी मुले व अन्य नातेवाइकांना रुग्णवाहिकेत बसून तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले.
पोलिसांनी जोडबसवांना चौक, अकबर कासिम मस्जिद, जमखंडी पूल, मेहबूब हॉटेल, आचार्य रंगा चौक आदी परिसर सील करून टाकला. या परिसरामध्ये एकाही व्यक्तीला आज सोडले जात नव्हते. पोलिसांचा मोठा फौजफाटा या परिसरामध्ये बंदोबस्तासाठी लावण्यात आला होता. या पहिल्या बळीमुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.