बार्शीत वेळेवर दुकाने उघडली अन् बंदही झाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:27 AM2021-06-09T04:27:57+5:302021-06-09T04:27:57+5:30
अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवा वगळता सर्व दुकानेही बंद होती. विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवरही पोलिसांनी कारवाई आरंभली. त्यामुळे बाजारपेठा या ओस ...
अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवा वगळता सर्व दुकानेही बंद होती. विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवरही पोलिसांनी कारवाई आरंभली. त्यामुळे बाजारपेठा या ओस पडल्याचे दिसून आले. दोन महिन्यांनंतर दुकाने उघडणार असल्याने, व्यापाऱ्यांमध्ये उत्साह दिसून आला. दुकाने उघडताना, प्रत्येक व्यापारी सॅनिटायझर, मास्क आदी साहित्याची तयारी करूनच आले होते.
कपडे बाजार, सराफ कट्टा, स्टेशनरी दुकाने या ठिकाणी मोठी गर्दी दिसली. शेतीशी निगडित दुकानासमोर शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. नगरपालिका आणि पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने शासनाने घालून दिलेल्या नियमाचे पालन करण्याकडे व्यापारी वर्गाचा कल असल्याचे दिसून आला. नागरिकही दंडाच्या भीतीने मास्क घालूनच घराबाहेर पडले होते.
-----
आम्ही सर्व व्यापाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करण्याच्या, तसेच मास्क असल्याशिवाय कोणत्याही ग्राहकांना कोणतीच वस्तू द्यायची नाही, अशा सूचना दिल्या आहेत, तसेच दुकाने वेळेवर सुरू करून बंद करण्यास कळविले आहे. त्यामुळे व्यापारी तर नियमाचे पालन करतील, परंतु नागरिकांनीही जास्त गर्दी न करता आम्हाला सहकार्य करावे, असे आवाहन व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुभाष लोढा यांनी केले आहे.
----०७बार्शी बाजारपेठ
दोन महिन्यांनंतर संचारबंदीचे निर्बंध शिथिल केल्यानंतर बार्शीच्या बाजारपेठेत दुकाने उघडली. ग्राहकांनीही कोरोनाचे नियम पाळत खरेदी केली. दोन महिन्यांनंतर संचारबंदीचे निर्बंध शिथिल केल्यानंतर बार्शीच्या बाजारपेठेत दुकाने उघडली. ग्राहकांनीही कोरोनाचे नियम पाळत खरेदी केली.