करमाळा तालुक्यात कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:22 AM2021-05-08T04:22:19+5:302021-05-08T04:22:19+5:30

यावर भाजपचे शंभूराजे जगताप यांनी मोदी सरकारकडून जास्तीतजास्त लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्याकडे पत्राद्वारे ...

Shortage of corona vaccine in Karmala taluka | करमाळा तालुक्यात कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा

करमाळा तालुक्यात कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा

Next

यावर भाजपचे शंभूराजे जगताप यांनी मोदी सरकारकडून जास्तीतजास्त लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

यात त्यांनी म्हटले आहे की, करमाळा तालुक्यात ११८ गावांमध्ये लसीकरण सुरू आहे. त्या गावांत लस अपुरी पडत आहे. त्या लसी वाढवून देण्यासाठी आपण केंद्र सरकारकडे मागणी करावी. बऱ्याच गावांमध्ये आठवड्याला फक्त १०० लसींचा पुरवठा केला जात आहे. त्यात पीएचसी केंद्रांतर्गत ४ गावे घेतली जात आहेत. त्यामुळे प्रति गावात २५ लसी दिल्या जात आहेत. महिन्यात फक्त २,९५० नागरिकांनाच लस उपलब्ध होत असल्याने एकाच ठिकाणी गर्दी होत आहे.

बरेच लोक पहाटे ६ वाजल्यापासून रांगेत उभे राहूनही लस न घेता माघारी जात आहेत. असेच सुरू राहिले तर करमाळा तालुक्याची लोकसंख्या पाहता ८ वर्षांचा कालावधीसुद्धा अपुरा पडेल. कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे एका गावात किमान ५०० लसींचा पुरवठा तातडीने करण्यात यावा, अशी विनंती पत्राद्वारे त्यांनी केली आहे.

-----

Web Title: Shortage of corona vaccine in Karmala taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.