अन्य तालुक्यांतील रुग्णांना बार्शीत ॲडमिट करुन घ्यायचे का? विचार करावा लागेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:22 AM2021-04-21T04:22:59+5:302021-04-21T04:22:59+5:30

आमदार राऊत पुढे म्हणाले की, रेमडेसिविर इंजेक्शन व ऑक्सिजन पुरवठा याचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. तामलवाडीच्या ऑक्सिजन प्लांटमध्ये बार्शीच्या ...

Should patients from other talukas be admitted in Barshi? Have to think | अन्य तालुक्यांतील रुग्णांना बार्शीत ॲडमिट करुन घ्यायचे का? विचार करावा लागेल

अन्य तालुक्यांतील रुग्णांना बार्शीत ॲडमिट करुन घ्यायचे का? विचार करावा लागेल

Next

आमदार राऊत पुढे म्हणाले की, रेमडेसिविर इंजेक्शन व ऑक्सिजन पुरवठा याचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. तामलवाडीच्या ऑक्सिजन प्लांटमध्ये बार्शीच्या गाड्या भरून दिल्या जात नाहीत. आमच्या तालुक्यातील सर्वपक्षीय नेते कोरोनाकाळात झटत असताना इतर तालुक्यातील पुढाऱ्यांचीही तेवढीच जबाबदारी आहे.

अन्य तालुक्यातील रुग्ण काही आमचे दुश्मन नाहीत, पण अडचणी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पुढाऱ्याला तेथील जनतेने जाब विचारावा. चार चार साखर कारखाने काढतात, मग एखादे हॉस्पिटल का काढत नाहीत, असा सवाल त्यांनी केला. दोन दिवसांत जर सुधारणा केली नाही, तर त्याला आम्ही जबाबदार नाही, तुम्ही माणुसकी दाखवणार नसाल तर आम्हीही दाखवणार नाही. ऑक्सिजन आणि इंजेक्शनचा तुटवडा असल्याने आम्हाला हा निर्णय घ्यावा लागत आहे, असे राऊत म्हणाले.

Web Title: Should patients from other talukas be admitted in Barshi? Have to think

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.