न्यायालयाचे आदेश दाखवा; ‘सांगोला’, ‘स्वामी समर्थ’चा ताबा घ्या, सोलापूरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची शिखर, जिल्हा बँकेला सूचना !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 12:59 PM2018-01-09T12:59:11+5:302018-01-09T13:00:45+5:30
कर्ज थकबाकीप्रकरणी मालमत्ता जप्तीसंदर्भात न्यायालयाने दिलेल्या आदेशाची लेखी प्रत दाखवा आणि सांगोला सहकारी साखर कारखाना आणि स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या मालमत्ता ताब्यात घ्या, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी शिखर बँक आणि जिल्हा बँक प्रशासनाला दिल्या.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ९ : कर्ज थकबाकीप्रकरणी मालमत्ता जप्तीसंदर्भात न्यायालयाने दिलेल्या आदेशाची लेखी प्रत दाखवा आणि सांगोला सहकारी साखर कारखाना आणि स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या मालमत्ता ताब्यात घ्या, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी शिखर बँक आणि जिल्हा बँक प्रशासनाला दिल्या.
सांगोला आणि स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याकडील कर्ज वसुलीसाठी सरफेसी कायद्यांतर्गत कारवाई व्हावी यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या दालनात सोमवारी शिखर बँक आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रशासनाची बैठक झाली. शिखर बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे सदस्य अविनाश महागांवकर यांच्यासह जिल्हा बँकेचे अधिकारी उपस्थित होते. स्वामी समर्थ कारखान्यावर शिखर बँकेचे ९.३१ कोटी तर जिल्हा बँकेचे ८६.५२ कोटींचे कर्ज थकीत आहे. सांगोला कारखान्यावर शिखर बँकेचे ३९.१२ कोटी आणि जिल्हा बँकेचे ७९.१२ कोटींचे कर्ज आहे. स्वामी समर्थने आरआरसी कारवाई अंतर्गत पैसे भरलेले नाहीत. या कारखान्यावर सरफेसी अंतर्गत कारवाई करू न ताबा द्या. आम्ही महसूल प्रशासनाचे ३१ लाख रुपये भरू, असे शिखर बँकेच्या वतीने सांगण्यात आले. सांगोला कारखान्याने १ जुलैै २०१६ रोजी ५० टक्के पैसे भरण्याची तयारी दखविली होती. परंतु न्यायालयाने आदेश देऊनही थकीत कर्ज न भरल्याने सरफेसी कायद्यान्वये कारखान्याच्या मालमत्तेचा ताबा द्या, अशी मागणी केली. त्यावर जिल्हाधिकाºयांनी लेखी आदेश दाखवा, आम्ही कारखान्यावर सरफेसी कायद्यांतर्गत कारवाईसाठी सहकार्य करू, असे सांगितले.
-----------------------
विजय शुगर्सची बुधवारी सुनावणी
- विजय शुगर्सवरील आरआरसी कारवाई आणि जिल्हा बँकेकडील थकबाकी वसुलीसाठी जिल्हाधिकाºयांकडे सुनावणी सुरू आहे. जिल्हाधिकाºयांनी कारखान्याला आणि जिल्हा बँकेला म्हणणे मांडण्याचे आदेश दिले होते. बुधवारी यासंदर्भात पुढील सुनावणी होणार आहे.
क्रीडा संकुलातील गाळ्यांचा फेरलिलाव करा
- जिल्हा क्रीडा संकुल समितीचीही सोमवारी जिल्हाधिकाºयांकडे बैठक झाली. तीत क्रीडा संकुलातील गाळे वाटपात तत्कालीन क्रीडा अधिकाºयांनी क्रीडा संकुल समितीची मान्यता न घेताच गाळ्यांचे भाडेकरार केल्याचे लक्षात आले. या अधिकाºयांची चौकशी करावी, असे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले. परंतु हे अधिकारी निवृत्त झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या गाळेधारकांकडील थकबाकी वसूल करा आणि या गाळ्यांचा फेरलिलाव करा, असे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले.
सीना-माढाचे भूसंपादन मार्गी लावा
- आमदार बबनराव शिंदे यांनी सोमवारी सीना-माढा उपसा सिंचन योजनेच्या भूसंपादनाचे प्रश्न मार्गी लावावेत, या मागणीसाठी जिल्हाधिकाºयांची भेट घेतली. महसूल प्रशासनाने या कामात सहकार्य करावे, अशी सूचना जिल्हाधिकाºयांनी केली.