शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्यांना जागा दाखवा: गोडसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:21 AM2021-04-06T04:21:23+5:302021-04-06T04:21:23+5:30

मंगळवेढा तालुक्यातील मुंढेवाडी, रहाटेवाडी, तामदर्डी आदी गावात त्यांनी प्रचारसभा घेतल्या. यावेळी गोडसे यांनी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना व ...

Show the place to those who are exploiting the farmers: Godse | शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्यांना जागा दाखवा: गोडसे

शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्यांना जागा दाखवा: गोडसे

Next

मंगळवेढा तालुक्यातील मुंढेवाडी, रहाटेवाडी, तामदर्डी आदी गावात त्यांनी प्रचारसभा घेतल्या. यावेळी गोडसे यांनी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना व श्रीसंत दामाजी सहकारी साखर कारखान्याकडून गेल्या काही वर्षापासून शेतकरी, कामगारांची पिळवणूक होत आहे. याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला. हे साखर कारखानदार शेतकऱ्यांची कोट्यावधी रुपयांची ऊस बिले फुकट वापरत आहेत. त्याच पैशाचे व्याज शेतकरी बँकांना भरत आहेत. देणी देण्यासाठी या कारखानदारांकडे पैसे नाहीत. मात्र निवडणुका आल्या की यांच्याकडे खर्च करण्यासाठी पैसे कोठून, असा सवाल त्यांनी केला.

मंगळवेढा पाणीप्रश्नावर गेल्या अनेक वर्षांपासून भाजप, महाविकास आघाडीकडून अदलून बदलून विधाने करत सर्वसामान्य शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. हा पाणीप्रश्न शासन दरबारी चुकीच्या पद्धतीने मांडल्यामुळे शेतकरी हक्काच्या पाण्यापासून वंचित आहेत. विरोधक निवडणुकीपुरते येतात आणि खोटे बोलून लोकांना भावनिक करत मते मागतात असाही आरोप गोडसे यांनी केला.

फोटो लाईन :::::::::::::::::

०५पंड०३

तामदर्डी येथील प्रचार सभेत बोलताना शैला गोडसे.

----

Web Title: Show the place to those who are exploiting the farmers: Godse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.