माणूसकी दाखविली; साडेतीन हजार पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ‘खाकी’ धावली
By appasaheb.patil | Published: October 22, 2020 01:20 PM2020-10-22T13:20:50+5:302020-10-22T13:23:11+5:30
सोलापूर ग्रामीण पोलिसांची कामगिरी; ९८७ लोकांचा जीव वाचविण्यात आले यश
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : एकीकडे पुराच्या पाण्याने गावागावांना घातलेला वेढा..वाड्यावस्त्यांसह गावागावात शिरलेले पाणी..मिळेल ती होडी अन् दिसेल त्या पयार्यी रस्त्यानं आम्ही पोहोचलो...आम्हाला वाचवा..आम्हाला वाचवा..अशी आर्त हाक देणा?्या पूरग्रस्तांकडे पाहून कधीकधी डोळेही पाणावले...पण हिंमत नाही हरली, तहान, भूक विसरून जिवाची परवा न करता, महापुरातील पाण्याचा वेग, अंदाज न पाहता सोलापूर ग्रामीण पोलिसांनी साडेतीन हजार लोकांची मदत करून ९८७ जणांचा जीव वाचविला.
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली़ पावसाच्या पाण्याने भीमा, नीरा, हरणा नदीसह छोट्या मोठ्या तलावाने पाण्याची पातळी ओलांडली़ त्यामुळे नद्या, तलाव व ओढ्यातील पाणी गावात शिरले़ गावातील पाण्याची पातळी वाढू लागल्याने लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी शथीर्चे प्रयत्न सुरू झाले़ जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन पथकासह ग्रामीण पोलिसांच्या कर्मचा?्यांनीही लोकांच्या मदतीसाठी एक पाऊल पुढे ठेवला होता.
९८१ पोलीस कर्मचारी होते बंदोबस्तावर...
अतिवृष्टीने सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, अक्कलकोट, दक्षिण सोलापूरसह अन्य तालुक्यात महापुराच्या पाण्याने वेढा घातला होता़ महापुरातील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले़ याशिवाय अनेक पुलावरून पाणी वाहू लागल्याने जिल्ह्यातील बहुतांश भागातील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती, पुलावरून धोकादायक वाहतूक होणार नाही यासाठी अहोरात्र पोलीस तैनात करण्यात आले होेते़ अतिवृष्टीग्रस्त भागावर नजर ठेवण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी ९८१ पोलिसांचा विशेष बंदोबस्त ठेवला होता.
पोलीस ठाणेनिहाय विशेष कामगिरीवर एक नजर...
- - पुराचे पाणी खेडभोसे गावात शिरल्यानंतर करकंब पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील यांनी शेवते गावातून ३ किलोमीटर गुडघाभर पाण्यातून वाट काढत ५० ते ६० कुटुंबीयांना सुरक्षितस्थळी हलविले़
- - मोहोळ पोलीस ठाणे हद्दीतील घाटणे शिवारातील सावंत, कारंडे वस्ती येथे पुराचे पाणी वाढत असल्याचे कळताच मोहोळचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी घटनास्थळी पोहोचून सहा ते सात कुटुंबातील सदस्यांना होडीतून सुरक्षितस्थळी हलविले़ याशिवाय २० गावातील लोकांना पोलिसांनी मदत केली़
- - टेंभुर्णी पोलीस ठाणे हद्दीतील वेणेगाव येथील नाळे कुटुंबातील सदस्य व आहेरगाव येथील कांबळे दाम्पत्यांना सहायक पोलीस निरीक्षक शितोळे, पोलीस नाईक भानवसे, ठोंबरे, कुलकर्णी, माने, देशमुख यांनी पुरातून बाहेर काढले़
- - मुंगशी (वैराग) येथे पुरात १४ तास आंब्याच्या झाडावर अडकून पडलेल्या तिघांना वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र राठोड यांच्या पथकांनी मदत केली.
अतिवृष्टीच्या काळात सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील प्रत्येक अधिकारी व कर्मचा?्यांनी अहोरात्र प्रामाणिकपणे सेवा बजाविली़ आपल्या जिवाची परवा न करता आमच्या अधिकारी व कर्मचा?्यांनी पूरग्रस्तांना मदत केली, अनेकांचा जीव वाचविला़ येथून पुढेही परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत आम्ही सर्वांची काळजी घेऊ यासाठी सर्वांनी पोलिसांना सहकार्य करावे़- तेजस्वी सातपुते,
पोलीस अधिक्षक, सोलापूर ग्रामीण़
पंढरपूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोटसह अन्य तालुक्यांना महापुराचा चांगलाच फटका बसला़ लोकांच्या मदतीसाठी पोलिसांची विशेष पथके तैनात केली होती, अनेक पोलीस अधिकारी व कर्मचा?्यांनी विशेष कामगिरी करून अनेकांना मदत करून जीव वाचविले़ महापुरातील या सर्वांच्या कामांचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे कौतुक केले आहे़
- अतुल झेंडे,
अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण