दुकाने, आस्थापनांच्या पाट्या मराठीत लावा; राज्यशासनाकडून अधिसूचना जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2022 06:45 PM2022-05-23T18:45:30+5:302022-05-23T18:45:35+5:30

जिल्हा प्रशासनाच्या सूचना; शासनाकडून अधिसूचना जारी

Shows of shops and establishments in Marathi; State Government issues notification | दुकाने, आस्थापनांच्या पाट्या मराठीत लावा; राज्यशासनाकडून अधिसूचना जारी

दुकाने, आस्थापनांच्या पाट्या मराठीत लावा; राज्यशासनाकडून अधिसूचना जारी

googlenewsNext

सोलापूर : महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम २०१७ मध्ये सुधारणा करण्यासाठी अधिनियमातील कलम ३६ क अधिसूचनेद्वारे अंतर्भूत करण्यात आलेला आहे. कलम ३६ क (९) कलम ६ अन्वये नोंदणी केलेल्या प्रत्येक आस्थापनेचा किंवा ज्या आस्थापनेला कलम ७ लागू आहे, त्या प्रत्येक आस्थापनेचा नामफलक देवनागरी लिपीतील मराठी भाषेमध्ये असेल, याची सर्व दुकानदारांनी, आस्थापनांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

आस्थापनेच्या नियोक्त्याकडे, देवनागरी लिपीतील मराठी भाषेव्यतिरिक्त इतर कोणत्याही भाषेतील व लिपीतील नामफलकही असू शकतील. मात्र, या नामफलकापूर्वी मराठी भाषेतील अक्षरलेखन आवश्यक असेल. मराठी भाषेतील अक्षरांचा टंक आकार, इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या टंक आकारापेक्षा लहान असणार नाही, याची दक्षता सर्वांनी घ्यावी, असेही अधिसूचनेत म्हटले आहे.

--------

दारूच्या दुकानांना महान व्यक्तींची नावे नको...

ज्या आस्थापनांमध्ये मद्य पुरविले जाते किंवा विकले जाते, अशा आस्थापना नामफलकावर महान व्यक्तींची किंवा गडकिल्ल्यांची नावे लिहिणार नाहीत, याचीही दक्षता संबंधितांनी घ्यावी. अधिसूचनेच्या अनुषंगाने सर्व विभागीय, जिल्हा व स्थानिक कार्यालयांमार्फत अंमलबजावणी करण्यात यावी, असेही अधिसूचनेत म्हटले आहे.

Web Title: Shows of shops and establishments in Marathi; State Government issues notification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.