नरोटेवाडीच्या श्रेयशचा डेंग्यूूनं घेतला बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:23 AM2021-09-11T04:23:37+5:302021-09-11T04:23:37+5:30
उत्तर सोलापूर तालुक्यातील नरोटेवाडी येथील श्रेयशला उपचारासाठी प्रथम बाळे येथील खासगी रुग्णालयात व नंतर सोलापुरातील बालरुग्णालयात उपचारासाठी दाखल केले ...
उत्तर सोलापूर तालुक्यातील नरोटेवाडी येथील श्रेयशला उपचारासाठी प्रथम बाळे येथील खासगी रुग्णालयात व नंतर सोलापुरातील बालरुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांनी नरोटेवाडी येथील सर्वेक्षण केले असून नंतर धुरळणीही केली असल्याचे सांगण्यात आले. श्रेयसच्या कुटुंबातील व्यक्तींनी डेंग्यूने दगावल्याचे सांगितले. तालुका आरोग्य अधिकारी मोहन शेगर यांनी कागदपत्रे तपासणी करून सांगतो असे सांगितले. मात्र डेंग्यूचा फैलाव होऊ नये यासाठी नरोटेवाडीत खबरदारी घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
----
अवघ्या ११ गावात धुरळणी
तालुक्यात साथीच्या आजाराने थैमान घातले असताना बेलाटी, हिरज, खेड, डोणगाव, एकरुख, बाणेगाव, कळमण, कौठाळी, नान्नज, नरोटेवाडी व राळेरास या ११ गावात ग्रामपंचायतींनी धुरळणी केली असल्याचे पंचायत समितीकडून सांगण्यात आले. तालुक्यात गावागावात विविध साथीच्या आजाराने नागरिक हैराण झाले असताना विस्तार अधिकारी उपलब्ध नाहीत. गावातील तरुण सोशल मीडियावर धुरळणी करावी, असे आवाहन करीत असले तरी दुर्लक्ष केले जाते, असा आरोप होऊ लागला आहे.
---फोटो