‘शिरापूर’चे पाणी एका दिवसातच झाले बंद; उत्तरमधील शेतकºयांचा संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 10:41 AM2018-11-26T10:41:11+5:302018-11-26T10:43:15+5:30
उत्तर तालुक्यातील शेतकºयांचा संताप; माढा तालुक्यात अडविले पाणी
सोलापूर: कॅनॉलचा दर्जा असलेल्या शिरापूर बंधाºयापर्यंत पोहोचलेले पाणी एका दिवसातच बंद झाले. बोगद्यातून बाहेर पडलेले पाणी माढा व मोहोळच्या शेतकºयांनी बंधाºयांची दारे टाकून अडविले. दरम्यान, रविवारी पोलिसांच्या मदतीने अधिकाºयांनी दारे काढल्याचे सांगण्यात आले.
भीमा-सीना बोगद्यातून उजनीचे २ नोव्हेंबर रोजी सोडलेले पाणी गुरुवारी रात्री शिरापूर बंधाºयापर्यंत आले. शुक्रवारी दुपारी बंधाºयावरील एक मोटार व सायंकाळपर्यंत ३ मोटारी सुरु करण्यात आल्या. दरम्यान, माढा व मोहोळच्या शेतकºयांनी बंधाºयाची दारे टाकली.
एकीकडे माढा तालुक्यातील मोटारीने पाणी उपसा सुरू तर दुसरीकडे बंधाºयाची दारे टाकल्याने पाण्याचा प्रवाह शनिवारी पूर्णपणे थांबला. वरून पाणी बंद झाल्याची बाब शिरापूरच्या पदाधिकाºयांपर्यंत पोहोचली.
लागलीच शिरापूरच्या पदाधिकाºयांनी नदीवरील तीनही मोटारी शनिवारी बंद केल्या. त्यामुळे उत्तर सोलापूर तालुक्याला मिळणारे पाणी शनिवारी दुपारी बंद झाले. शिरापूर उपसा सिंचन योजनेचे पाणी बीबीदारफळच्या पुढे नान्नजहून वडाळ्याकडे जात असतानाच मागे मोटारी बंद झाल्या. जिल्ह्यात सर्वात कमी ४० मि.मी. पाऊस मार्डी मंडलात पडला असल्याने अत्यंत पाण्याची गरज आहे. असे असताना प्रशासन या भागाला पाणी देण्यासाठी प्रयत्न करत नाही. उलट मागील २०-२२ दिवसांपासून पाणी उपसा करणाºया माढा तालुक्यातील शेतकºयांनी वरती पाणी अडविले.
कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी शिरापूर उपसा सिंचन योजनेसाठी ०.१५ टीएमसी पाण्याची तरतूद केली आहे. तरतूद केल्याप्रमाणे पाणी मिळावे, अशी मागणी उत्तर तालुक्यातून होत आहे.
शेतकºयांनी अचानक बंधाºयावर दारे टाकल्याने पाणी बंद झाले होते. रविवारी आमच्या अधिकाºयांनी काही बंधाºयाची दारे काढल्याने पाणी शिरापूर बंधाºयाकडे येऊ लागले आहे. ठरल्याप्रमाणे उत्तर सोलापूर तालुक्याला पाणी मिळेल.
- धीरज साळे, अधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण
पाण्याची सगळीकडूनच मागणी आहे. शिरापूर बंधाºयाच्या वरती पाणी अडविले होते. ते शिरापूर बंधाºयापर्यंत येत आहे. बंधाºयात आवश्यक तितके पाणी आल्यानंतर मोटारी सुरु करण्यात येतील.
- जयंत शिंदे, अधीक्षक अभियंता, भीमा कालवा मंडळ