कुमठ्यातील जैन मंदिरात शनिवारी श्रीवज्रपंजर विधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:10 AM2021-01-08T05:10:53+5:302021-01-08T05:10:53+5:30

सोलापूर : विश्व महामारी व याच्या काळजीने व्याकूळ झाले आहे. अशा परिस्थितीत भगवत भक्ती ही सर्वांना तारू शकते. या ...

Shrivajrapanjar statement on Saturday at a Jain temple in Kumtha | कुमठ्यातील जैन मंदिरात शनिवारी श्रीवज्रपंजर विधान

कुमठ्यातील जैन मंदिरात शनिवारी श्रीवज्रपंजर विधान

Next

सोलापूर : विश्व महामारी व याच्या काळजीने व्याकूळ झाले आहे. अशा परिस्थितीत भगवत भक्ती ही सर्वांना तारू शकते. या आनुषंगाने अतिशय क्षेत्र १००८ चंद्रप्रभू दिगम्बर जैन मंदिर समितीच्या वतीने १००८ श्री चंद्रप्रभू भगवान व १००८ पार्श्वनाथ भगवान यांच्या जन्म कल्याणकचे औचित्य साधून व दीक्षा कल्याण हा सुवर्ण योग साधला. मंदिरात श्रीवज्रपंजर विधानाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष श्याम पाटील व सचिव वालचंद पाटील यांनी दिली.

सकाळी ८ वाजता ध्वजारोहण करण्यात येणार आहे. १० वाजता भगवंतास महाभिषेक करण्यात येणार आहे. दुपारी दीड वाजता हे विधान होणार असून, त्यासाठी सोलापुरातील श्रावक श्राविका यांनी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ५ वाजता या विधानाचा समारोप होणार आहे. या विधानासाठी डॉ. पंडित महावीर शास्त्री, पंडित आनंद मालगत्ते, पंडित अक्षय शहा यांनी नियोजन केले आहे. कोरोनाचे नियम पाळून हे विधान मंगलमय वातावरणात होणार आहे. यासाठी मंदिर समितीचे उपाध्यक्ष नितीन कासार, मनोहर कासार, शीतल कासार, देवेंद्र कासार, वैभव पाटील, विक्रम पाटील, सचिन पाटील, अमोल पाटील, आनंद पाटील, भाग्येश पाटील, अजित पाटील, सागर पाटील, किरण पाटील, नितीन पाटील, महावीर पानपट, रवी कासार, संजय पानपट, संदीप पानपट, सुलचंद लोखंडे, दर्शन लोखंडे हे सहभागी होणार आहेत.

----

०६ कुमठे

Web Title: Shrivajrapanjar statement on Saturday at a Jain temple in Kumtha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.