सोलापुरात दोन दिवस शटडाऊन; शहरातील पाणीपुरवठ्यावर होणार परिणाम

By Appasaheb.patil | Published: January 20, 2023 06:48 PM2023-01-20T18:48:20+5:302023-01-20T18:48:43+5:30

सार्वजनिक पाणीपुरवठा विभागाने २२ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ९ ते ५ या वेळेसाठी एक दिवसाचा शटडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.

Shutdown for two days in Solapur Impact on water supply in the city | सोलापुरात दोन दिवस शटडाऊन; शहरातील पाणीपुरवठ्यावर होणार परिणाम

सोलापुरात दोन दिवस शटडाऊन; शहरातील पाणीपुरवठ्यावर होणार परिणाम

googlenewsNext

सोलापूर :

सार्वजनिक पाणीपुरवठा विभागाने २२ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ९ ते ५ या वेळेसाठी एक दिवसाचा शटडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम हाेणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीस १२३ केव्ही कर्मयोगी साखर कारखाना ते १३२ केव्ही इंदापुर सबस्टेशन लाईन मेन्टेनन्स व तसेच इंस्युलेटर स्ट्रिंगीग कोल्ड वॉश करण्याकरिता रविवारी शटडाऊन घेण्यात आला आहे. त्यामुळे उजनी हेड वक्र्स येथील पंप हाऊसकरिता १३२ केव्ही इंदापूर सबस्टेशनहून येणारी ३३ केव्ही लाईन बंद राहणार आहे. या कामामुळे उजनी हेड वक्र्स येथून पाण्याचा उपसा कमी होणार असल्याने २२ व २३ जानेवारी २०२३ रोजीचा काही भागातील पाणीपुरवठा रोटेशन एक ने पुढे जाणार आहे. याशिवाय उशिरा, कमी वेळ अन् कमी दाबाने होणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन सार्वजनिक आरोग्य अभियंता संजय धनशेट्टी यांनी केले आहे.

Web Title: Shutdown for two days in Solapur Impact on water supply in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.