सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्षपदी श्वेताली डांबरे, सचिवपदी करमाळ्याची राणी गायकवाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 04:14 PM2018-02-16T16:14:37+5:302018-02-16T16:16:28+5:30

गेल्या अनेक महिन्यांपासून लक्ष लागून असलेल्या सोलापूर विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्षपदी व्ही. जी. शिवदारे महाविद्यालयातील एम. एस्सी. वर्गातील विद्यार्थिनी श्वेताली डांबरे तर सचिवपदी प्रतापसिंह मोहिते महाविद्यालयातील बी. एस्सी.तील राणी गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली.

Shwetali Dambre as President of Solapur University's Student Council, Queen of Gaikwad | सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्षपदी श्वेताली डांबरे, सचिवपदी करमाळ्याची राणी गायकवाड

सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्षपदी श्वेताली डांबरे, सचिवपदी करमाळ्याची राणी गायकवाड

googlenewsNext
ठळक मुद्देसलग १२ व्या वर्षीही जनसेवा संघटनेने या निवडणुकीत वर्चस्व कायम ठेवले आहेजनसेवा संघटना एक व्यासपीठ : डॉ. धवलसिंह मोहिते-पाटीलविद्यार्थी प्रश्न मांडण्यासाठी सर्व समिती सदस्यांचे सहकार्य घेत कार्य करणार : श्वेताली डांबरे


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १६ : गेल्या अनेक महिन्यांपासून लक्ष लागून असलेल्या सोलापूर विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्षपदी व्ही. जी. शिवदारे महाविद्यालयातील एम. एस्सी. वर्गातील विद्यार्थिनी श्वेताली डांबरे तर सचिवपदी प्रतापसिंह मोहिते महाविद्यालयातील बी. एस्सी.तील राणी गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली.
सलग १२ व्या वर्षीही जनसेवा संघटनेने या निवडणुकीत वर्चस्व कायम ठेवले आहे. अध्यक्ष व सचिव पदासाठी सामाजिक शास्त्रे संकुलात गुरुवारी निवड प्रक्रिया झाली. अध्यक्ष व सचिव पदासाठी एकेक अर्ज दाखल झाले. राणी गायकवाड यांनी दाखल केलेल्या अर्जावर सुषमा बिराजदार व सुरभी कुलकर्णी यांच्या सूचक, अनुमोदक म्हणून सह्या होत्या. श्वेताली डांबरे यांच्या अर्जावर स्वाती राठोड व पूजा पटणे यांच्या सह्या आहेत. निवडणुकीवेळी विद्यार्थी समिती सदस्य स्वाती राठोड, रोहित डिसले,   सुषमा   बिराजदार, पूजा पटणे, राणी गायकवाड, भाग्यश्री कदम, शारदा प् ाडवळे, सुप्रिया नलावडे, सुरभी कुलकर्णी, गणेश मेरगू यांची उपस्थिती होती. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉ. ए. ए. घनवट, डॉ. गौतम कांबळे, डॉ. सूर्यकांत शिंदे यांनी काम पाहिले. निकाल जाहीर होताच विद्यापीठ परिसरात जल्लोष करण्यात आला. डॉ. आंबेडकर चौक (पार्क चौक) येथील जनसेवा विद्यार्थी संघटना कार्यालयात डॉ. धवलसिंह प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी अध्यक्ष, सचिव व मंडळ सदस्यांचा सत्कार केला. यावेळी प्रकाश नीळ, लहू गायकवाड, जनसेवेचे अभिराज शिंदे, जिल्हा अध्यक्ष सतीश पालकर, जुल्कर शेख, सुधीर रास्ते, मयूर माने, राहुल पाटील, योगेश बोधले, प्रशांत जगताप, निखिल जोशी, गणेश महाडिक, गणेश जगताप, विवेक शिंदे, ओंकार साने आदी उपस्थित होते. 
------------------------
जनसेवा संघटना एक व्यासपीठ : मोहिते-पाटील
- विद्यार्थी मंडळ निवडणुकीत कोणताही पक्षभेद नसावा. त्यांचा वावर नसावा. जनसेवा संघटना विद्यार्थ्यांसाठी एक सक्रिय व्यासपीठ आहे. यातून विद्यार्थी नेतृत्व उभे राहते. त्यास योग्य दिशा, मार्गदर्शन देणे इतकीच संघटनेची भूमिका आहे. कोणताही पक्ष या निवडणूक प्रक्रियेत निगडित नसावा, निवडीचे स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना लाभावे यासाठी समन्वयकाची भूमिकाही असते. असे मत डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. 
-------------------
विद्यार्थी प्रश्न मांडण्यासाठी सर्व समिती सदस्यांचे सहकार्य घेत कार्य करणार आहोत. जनसेवा संघटनेचे डॉ. धवलसिंह यांच्यासह संघटना पदाधिकारी, शिवदारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पाटील, प्राध्यापक, विद्यार्थी यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले. प्रश्न मार्गी लावण्यासाठी सतत कार्यरत राहणार. 
-श्वेताली डांबरे, अध्यक्ष, विद्यार्थी परिषद, सोलापूर विद्यापीठ.

Web Title: Shwetali Dambre as President of Solapur University's Student Council, Queen of Gaikwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.