बाजारातील आजारी जनावरेही होतील आता क्वारंटाईन; लम्पीचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना

By शीतलकुमार कांबळे | Published: December 21, 2023 12:20 PM2023-12-21T12:20:45+5:302023-12-21T12:21:21+5:30

प्रत्येक जनावरांची तपासणी

Sick animals in the market will also be quarantined Measures to prevent the spread of lumpy | बाजारातील आजारी जनावरेही होतील आता क्वारंटाईन; लम्पीचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना

बाजारातील आजारी जनावरेही होतील आता क्वारंटाईन; लम्पीचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना

शीतलकुमार कांबळे

सोलापूर : श्री सिद्धेश्वर यात्रा काळामध्ये शहरात जनावरांचा बाजार भरविण्यात येतो. सध्या हा बाजार कुठे भरविला जाणार हे स्पष्ट झाले नाही. तरी देखील पशू संवर्धन विभाग सतर्क आहे. लम्पीचा प्रसार होऊ नये म्हणून लक्षणे असलेल्या जनावरांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे.

जनावरांचा बाजार भरविला जावा अशी मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मंदिर समितीकडून करण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्यातील लम्पीबाधित जनावरांची स्थिती जिल्हाधिकारी कार्यालयाने जाणून घेतली. याबाबतचा अहवाल जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आला. सध्या लम्पीबाधित जनावरांची संख्या आटोक्यात असल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी बाजार भरविण्यास परवानगी दिली आहे.

दोन वर्ष कोरोना व मागील वर्षी लम्पी आजारामुळे जनावरांचा बाजार भरला नाही. सध्या लम्पीबाधित जनावरांची संख्या आटोक्यात आली आहे. त्यामुळे बाजार भरविण्यास जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी परवानगी दिली आहे.

प्रत्येक जनावरांची तपासणी

बाजारात येणाऱ्या प्रत्येक जनावरांची तपासणी केली जाणार आहे. यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे खास पथक त्या ठिकाणी असणार आहेत. तपासणीमध्ये आजारी आढळलेल्या जनावरांना क्वारंटाईन (अलगीकरण) करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात फक्त १८० लम्पीबाधित जनावरे

जिल्ह्यात १८० लम्पीबाधित जनावरे आहेत, तर उत्तर सोलापूर तालुक्यात फक्त सहा जनावरांना लम्पी झाला आहे. सर्व जनावरांचे लसीकरणही पूर्ण झाले आहे. त्यामुळे लम्पीचा धोका खूपच कमी झाला आहे. तरीही खबरदारी म्हणून पशुसंवर्धन विभागाकडून काळजी घेण्यात येत आहे.

Web Title: Sick animals in the market will also be quarantined Measures to prevent the spread of lumpy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.