सिध्देश्वरची चिमणी पाडकामाच्या कामाची पाहणी, शेतकरी, कर्मचाºयांकडून विरोध अडथळा, उद्या निघणार मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 02:26 PM2017-08-10T14:26:00+5:302017-08-10T14:26:08+5:30

सोलापूर दि १० : विमानतळास अडथळा ठरणारी सिध्देश्वर साखर कारखान्याच्या को जनरेशनची चिमणीचे पाडकाम कसे करायचे यासाठी आलेल्या ठेकेदाराने महानगरपालिकेचे अधिकाºयांसमवेत प्रचंड पोलीस बंदोबस्तात पाहणी उरकली़

Siddeshwar Chimani Padma work survey, obstruct resignation of farmers, employees, tomorrow to protest | सिध्देश्वरची चिमणी पाडकामाच्या कामाची पाहणी, शेतकरी, कर्मचाºयांकडून विरोध अडथळा, उद्या निघणार मोर्चा

सिध्देश्वरची चिमणी पाडकामाच्या कामाची पाहणी, शेतकरी, कर्मचाºयांकडून विरोध अडथळा, उद्या निघणार मोर्चा

Next


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १० : विमानतळास अडथळा ठरणारी सिध्देश्वर साखर कारखान्याच्या को जनरेशनची चिमणीचे पाडकाम कसे करायचे यासाठी आलेल्या ठेकेदाराने महानगरपालिकेचे अधिकाºयांसमवेत प्रचंड पोलीस बंदोबस्तात पाहणी उरकली़ दरम्यान, या पथकास कारखान्याचे शेतकरी सभासद व कर्मचाºयांनी तीव्र विरोध केला़ मनपाचे पथक चिमणी पाडण्यासाठीच येत आहे म्हणून कारखान्याच्या शेतकरी सभासद व कर्मचारी प्रवेशव्दारावर मोठया संख्येने जमा झाले़ चिमणी पाडकामासाठी कोणालाही जवळ येऊ दिले जाणार नाही अशी भूमिका घेत हे आंदोलक वादग्रस्त चिमणीच्या बांधकामावर जाऊन बसले़ 
दरम्यान, सोलापूर विमानतळासाठी अडथळा ठरणारी चिमणी कशी पाडायची याची पाहणी करण्यासाठी नाशिकच्या विहान कंपनीचे ठेकेदार कापसे यांनी नगर अभियंता लक्ष्मण चलवादी, उपअभियंता लक्ष्मण कारंजे यांच्यासह दुपारी बाराच्या सुमारास कारखानास्थळाला भेट दिली़ कारखाना स्थळावर आंदोलकांची गर्दी आहे हे समजताच पोलीस बंदोबस्त घेण्यात आला़ प्रथमत: पोलीस अधिकाºयांनी घटनास्थळी जाऊन आंदोलकांना एका बाजुला घेतले़ याच दरम्यान हे पथक आत आले़ त्यांनी चिमणीची पाहणी केली़ आंदोलकांनी निर्दर्शने केली़ पथकांना काय हवे आहे हे आंदोलकांना माहिती नव्हते़ पाहणी करून चिमणीचे पाडकाम कशा पध्दतीने करायचे याबाबत चर्चा केली़ तत्पुर्वी ही माहिती समजावून सांगण्यासाठी आंदोलकांना विश्वासात घ्यावे म्हणून एमआयडीसी पोलीस ठाण्यात बैठक झाली़ पण कारखान्याचे चेअरमन धर्मराज काडादी, संचालक अमर पाटील, शिवशरण पाटील, गुरूसिध्द म्हेत्रे आदी कारखाना स्थळावर ठाण मांडून होते़   दरम्यान, कारखाना प्रवेशव्दारावर आयोजित बैठकीत चेअरमन धर्मराज काडादी यांनी चिमणी पाडकामास विरोध करण्यासाठी उद्या शुक्रवार दि ११ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे घोषित केले़ हा मोर्चा सात रस्ता परिसरातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघणार आहे़ 

Web Title: Siddeshwar Chimani Padma work survey, obstruct resignation of farmers, employees, tomorrow to protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.