जिवंतपणीच सिद्धव्वांनी करुन ठेवली आपल्या अंत्यसंस्काराची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 12:47 PM2019-09-26T12:47:53+5:302019-09-26T12:54:18+5:30

जगण्याआधीच बचत... मरणानंतरच्या विधीसाठी : अखेरच्या श्वासापर्यंत केवळ लेकरांचाच केला विचार !

The Siddhivas kept their funeral preparations alive | जिवंतपणीच सिद्धव्वांनी करुन ठेवली आपल्या अंत्यसंस्काराची तयारी

जिवंतपणीच सिद्धव्वांनी करुन ठेवली आपल्या अंत्यसंस्काराची तयारी

Next
ठळक मुद्देसिद्धव्वांच्या उशीखालीच जमा झालेली पैशाची ती कापडी पिशवी असायचीमृत्यूच्या ८ दिवस ती पिशवी चुकून खाली पडली. लहान मुलगा अशोकने ती पिशवी पुन्हा आईच्या उशीखाली ठेवून दिली सिद्धव्वाने मुलींकडे ३० हजार रुपये जमा केले ते स्वत:च्या अंत्यविधीसाठीच

रेवणसिध्द जवळेकर

सोलापूर : कळीला त्रास होऊ नये म्हणून एक फुलपाखरु बागेबाहेरच फिरतं... किती त्रास द्यावा एखाद्याला, यालाही काही प्रमाण असते...आपल्यावरुनच विचार करावा, समोरच्यालाही मन असतं... कदाचित हा मंत्र जपत हयातीतच अंत्यसंस्काराची तजवीज करून ठेवताना सिद्धव्वा गुरुनाथ हरवाळकर या ८० वर्षीय वृद्ध मातेने जगाचा निरोप घेताना मतिमंद मुलासह दोन लेकरांचाच विचार केला; म्हणूनच तिने बचत केलेले पैसे तिच्याच अंत्यविधीला खर्च करण्यात आले.

पुरवठा खात्यात निरीक्षक म्हणून काम केलेले त्यांचे पती गुरुनाथ यांचे २३ वर्षांपूर्वी निधन झाले. पतीच्या निधनानंतर सिद्धव्वा यांनी धीर न सोडता शास्त्रीनगर भागात त्यांनी लाकडाचा अड्डा चालवत संसाराचा गाडा नेटाने पुढे नेला. त्यांचा एक मुलगा नागनाथ हा मतिमंद असून तो अविवाहित आहे. 

दुसरा मुलगा अशोक हा एका कंपनीत शिपाई म्हणून कार्यरत आहे. लक्ष्मीबाई शिवचलप्पा मैंदर्गीकर, सरोज परमेश्वर माशाळे आणि मंगल अंकुश नागनाळे या तीन लेकींच्या संसाराला गती देण्याचे कामही सिद्धव्वा यांनी आपल्या हयातीत केले. पती गेले अन् उद्या-परवा आपण गेल्यावर दोन्ही मुलांचं काय ? त्यातच १० वर्षांपूर्वी सिद्धव्वावर बायपास शस्त्रक्रिया झाली होती. त्यातून त्या सुखरुप झाल्या होत्या. आता आपण काही दिवसच आहोत, असा भास त्यांना होऊ लागला म्हणून त्या पतीच्या निधनानंतर येत असलेल्या पेन्शनमधील कधी शंभर तर कधी पाचशेची नोट गुंडाळून एका कापडी पिशवीत टाकून द्यायच्या. हेच पैसे आपल्या अंत्यविधीसाठी कामाला येतील, असे त्यांनी लेकींसमोर बोलूनही दाखवले होते. 

पैशाची ती पिशवी उशीखालीच राहायची !
- सिद्धव्वांच्या उशीखालीच जमा झालेली पैशाची ती कापडी पिशवी असायची. मृत्यूच्या ८ दिवस ती पिशवी चुकून खाली पडली. लहान मुलगा अशोकने ती पिशवी पुन्हा आईच्या उशीखाली ठेवून दिली. त्यात नेमके काय याची कल्पनाही अशोकला नव्हती. गेल्या राखीपौर्णिमेला तीन लेकी आणि नातवंडे घरी आली होती. त्यावेळी सिद्धव्वाने बचत केलेल्या पैशाचे काय करायचे हे सांगताना लेकीसह मुलगा अशोक, त्याची पत्नी कल्पना आणि अन्य मंडळी गहिवरुन गेली. कापडी पिशवीतील रक्कम मोजली असता त्यात १४ हजार ४०० रुपये निघाले. पैकी ४०० रुपये तिने सर्वच नातवंडांना देऊन आपली शेवटची भेट दिली. याशिवाय सिद्धव्वाने मुलींकडे ३० हजार रुपये जमा केले ते स्वत:च्या अंत्यविधीसाठीच.

सिद्धव्वा या माझ्या सासू असल्या तरी त्या माझ्या आईच होत्या. एक मुलगा मतिमंद तर दुसºया मुलास अत्यल्प पगार. त्यांच्या निधनानंतर पेन्शन बंद होणार असल्याने मुलांचे काय होणार ? ही चिंता सिद्धव्वा यांना असावी. यामुळेच त्यांना त्रास नको म्हणून स्वत:च्या अंत्यविधीसाठी त्यांनी हयातीत पैसे बचत करण्याचा प्रकार थक्क करणारा आहे.
-परमेश्वर माशाळे, 
जावई (बँक अधिकारी)

माझी आई सिद्धव्वा म्हणजे माझ्यासाठी एक संस्काराची वाट होती. ती नेहमी माझ्यासह माझ्या भावाचाच विचार करायची. तिच्या अंत्यविधीचा खर्च आमच्यावर येऊ नये, म्हणून त्या खर्चाची तरतूद हयातीत करणारी माझी आई म्हणजे साक्षात देवीच आहे.
-अशोक गुरुनाथ हरवाळकर, 
चिरंजीव

Web Title: The Siddhivas kept their funeral preparations alive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.