१११ जोडप्यांनी बांधल्या रेशीमगाठी

By admin | Published: January 12, 2015 01:18 PM2015-01-12T13:18:02+5:302015-01-12T13:24:05+5:30

वाकाव (ता. माढा) येथील जयवंतराव सावंत प्रतिष्ठानच्या वतीने परंडा तालुक्यातील भैरवनाथ शुगर सोनारी येथे आयोजित सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यात १११ जोडपी विवाहबद्ध झाली.

The silk fabric made by 111 couples | १११ जोडप्यांनी बांधल्या रेशीमगाठी

१११ जोडप्यांनी बांधल्या रेशीमगाठी

Next

मोडनिंब : वाकाव (ता. माढा) येथील जयवंतराव सावंत प्रतिष्ठानच्या वतीने परंडा तालुक्यातील भैरवनाथ शुगर सोनारी येथे आयोजित सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यात १११ जोडपी विवाहबद्ध झाली. 
यावेळी सिनेसृष्टीतील महेश मांजरेकर, अलका कुबल, पूजा पवार, निशिगंधा वाड या कलाकारांची उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. विवाह सोहळ्यासाठी आ. ओमराजे निंबाळकर, सोलापूर जि. प. चे माजी अध्यक्ष रामचंद्र माने, उस्मानाबाद जि.प. चे अर्थ व बांधकाम खात्याचे सभापती दत्तात्रय मोहिते, भैरवनाथ शुगरचे चेअरमन प्रा. तानाजी सावंत, व्हा. चेअरमन शिवाजी सावंत, सूर्यवंशी, दयानंद मारकड, सुभाष गोरे, भजनदास खटके, यासीन बहामद, शशी पाटील, बाळासाहेब गाडे-पाटील, बाळासाहेब जगताप, जयंत पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे, भाजपाचे अरविंद पवार आदी मान्यवर उपस्थित होते. 
अलका कुबल म्हणाल्या, सावंत कुटुंबीयांनी गेल्या १५ वर्षांपासून मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून हजारोंचे संसार उभे करून पुण्याईचे काम केले. अशी उदार अंत:करणाची माणसे कमीच पाहायला मिळतात, असे गौरवोद्गार काढले. 
याप्रसंगी वधू-वरांना प्रतिष्ठानतर्फे सांसारिक वस्तू देण्यात आल्या.
विवाह सोहळ्यासाठी पं. स. सदस्य पृथ्वीराज सावंत, ऋतुराज सावंत, रवी सावंत, अनिल सावंत, केशव सावंत, किरण सावंत, गिरीराज सावंत, संजय सावंत, रामभाऊ मस्के, गोवर्धन चवरे यांच्यासह जयवंतराव सावंत प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. यावेळी लाखापेक्षा जास्त वर्‍हाडी मंडळींनी भोजनाचा आस्वाद केला. (वार्ताहर)

Web Title: The silk fabric made by 111 couples

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.